नवी दिल्लीः सेलची सुरुवात १६ ऑक्टोबर पासून होणार आहे. हा सेल २१ ऑक्टोबर पर्यंत म्हणजेच ६ दिवसांपर्यंत चालणार आहे. फ्लिपकार्टने आता वेगवेगळ्या कॅटगरीच्या प्रोडक्टवर मिळणारी सूट आणि ऑफर्स संबंधी माहिती द्यायला सुरुवात केली आहे. आता पोकोने फ्लिपकार्ट सेलमध्ये आपल्या स्मार्टफोन्सवर मिळणाऱ्या सूटची घोषणा केली आहे.

वाचाः

पोकोने आपल्या ट्विटर वरून ही माहिती दिली आहे. कंपनी पहिल्यांदा आपल्या स्मार्टफोन्सवर डिस्काउंट देणार आहे. या फोनला नुकतेच लाँच करण्यात आलेले आहे. यात , Poco M2, , आणि या फोनचा समावेश आहे. ची किंमत १० हजार ९९९ रुपये आहे. परंतु, या सेलमध्ये ५०० रुपयांच्या सूटनंतर या फोनला १० हजार ४९९ रुपयांत खरेदी करता येवू शकते. तर पोको एम२ प्रोला एक हजार रुपयांच्या किंमतीत १३ हजार ९९९ रुपये ऐवजी १२ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येवू शकते.

वाचाः

पोको एक्स २ वर एक हजार रुपयांची सूट मिळणार आहे. या फोनला १७ हजार ४९९ रुपयांऐवजी १६ हजार ४९९ रुपयांत खरेदी करण्याची संधी आहे. तर पोको एक्स ३ ला लिस्ट करण्यात आले परंतु, याच्या किंमतीत कोणतीही कपात करण्यात आली नाही. या फोनची किंमत १६ हजार ९९९ रुपये आहे. पोको सी ३ च्या बेस व्हेरियंटची किंमत ७ हजार ४९९ रुपये आहे. फ्लिपकार्ट सेलमध्ये एसबीआय कार्डवरुन फोन खरेदी केल्यास १० टक्के तात्काळ डिस्काउंट मिळणार आहे.

वाचाः

वाचाः

पोको सी ३ कंपनीचा सर्वात लेटेस्ट फोन आहे. या फोनला ३ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेज आणि ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेज व्हेरियंटमध्ये लाँच करण्यात आले आहे. पोको सी ३ मध्ये ६.५३ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. हँडसेटमध्ये मीडियाटेक हीलियो जी ३५ प्रोसेसर दिला आहे. या फोनमध्ये 5000mAh बॅटरी दिली आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here