वाचाः
ईकॉमर्स साइट फ्लिपकार्टवर या वर्षीच्या सुरुवातीला लाँच झालेल्या Samsung Galaxy S20+ फोनवर मोठा डिस्काउंट मिळणार आहे. या फोनला ग्राहक ४९ हजार ९९९ रुपयांत खरेदी करु शकतील. फ्लिपकार्ट प्लस मेंबर्ससाठी हा सेल १५ ऑक्टोबर पासून ओपन होत आहे. तर बाकीच्या ग्राहकांसाठी १६ ऑक्टोबर पासून सुरू होत आहे. बिग बिलियन डेज सेल मध्ये या पॉवरफुल डिव्हाइसेजची किंमत ४९ हजार ९९९ रुपये आहे. या डिव्हाईसवर २८ हजारांचा फ्लॅट डिस्काउंट मिळत आहे. तसेच फोनला आणखी कमी किंमतीत खरेदी करता येवू शकते.
वाचाः
असे मिळणार डिस्काउंट
फेब्रुवारी मध्ये लाँच झालेल्या सॅमसंगच्या या फोनवर मोठा डिस्काउंट कंपनी देत आहे. नवीन अपग्रेड प्लानसोबत Samsung Galaxy S20+ केवळ ३५ हजार १९८ रुपयांत खरेदी करता येवू शकते. या फोनची किंमत ८३ हजार रुपये आहे. या फोनवर या सेलमध्ये खास ऑफर दिली जात आहे. सॅमसंगच्या या फोनवर ७० टक्के डिस्काउंट दिला जात आहे. तसेच हा फोन एका वर्षापर्यंत वापरून त्यानंतर पुढील वर्षी एक्सचेंज करून नवीन फोन खरेदी करू शकता. तसेच बाकीचे ३० टक्के किंमत देवून हा फोन तुम्ही तुमच्याकडे ठेवू शकता.
वाचाः
फोनचे वैशिष्ट्ये
केवळ ३५ हजार १९८ रुपये आपल्या क्रेडिट कार्डने किंवा क्रेडिट कार्ड ईएमआय या ऑप्शनने देवून या सेलमध्ये हा फोन वर्षभरासाठी खऱेदी करता येवू शकतो. जर वर्षभरानंतर तुम्हाला हा फोन तुमच्याकडे ठेवायचा असल्यास बाकीचे १४ हजार ८०१ रुपये द्यावे लागतील. फ्लॅगशीप फोन दोन ते चार वर्षांपर्यंत चांगला परफॉर्मन्स करू शकतात. या फोनमध्ये ६.७ इंचाचा Infinity-O डिस्प्ले दिला आहे. Exynos 990 प्रोसेसर सोबत ८ जीबी रॅम दिला आहे. फोनमध्ये 64MP क्वॉड रियर आणि 10MP फ्रंट कॅमेरा दिला आहे. या फोनमध्ये २५ वॉट फास्ट चार्जिंग सोबत 5,000mAh बॅटरी दिली आहे.
वाचाः
वाचाः
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times