सध्याच्या डिजिटल युगात आबालवृद्धांच्या फोनमध्ये हमखास दिसून येणारे अॅप म्हणजे व्हॉटसअॅप. मे २००९ मध्ये लाँच झालेलं हे इन्स्टंट मेसेजिंग अॅप एका दशकातच जागतिक पातळीवर अब्जावधी लोकांच्या गळ्यातील ताईत बनलं आहे. व्हॉटसअॅपची वाढती प्रसिद्धी पाहून फेब्रुवारी २०१४मध्ये सुप्रसिद्ध सोशल नेटवर्किंग कंपनी फेसबुकने व्हॉटसअॅपचे सर्व मालकी हक्क विकत घेतले आणि त्यानंतर या चॅटिंग अॅपमध्ये कमालीचे अपडेट्स येऊ लागले. आज आपण अलीकडे आलेल्या आणि भविष्यात येऊ शकणाऱ्या व्हॉट्सअॅप अपडेट्स विषयी माहिती मिळवू या.
वाचाः
डार्क मोड
यंदा वर्षाच्या सुरुवातीलाच व्हॉटसअॅपने डार्क मोड हे फीचर युजर्सना उपलब्ध करून दिले. ऑपरेटिंग सिस्टिम मध्ये डार्क मोड आल्यानंतर आणि युजर्सचा त्याला मिळणारा वाढीव प्रतिसाद बघून सर्वच सोशल नेटवर्किंग अॅप्समध्ये सुद्धा हा ट्रेंड विकसित झाला. व्हॉटसअॅप मध्ये सुद्धा चॅट सेटिंग्ज मध्ये जाऊन तुम्ही डार्क मोड निवडू शकता. या मोड मध्ये कमी ब्राईटनेस असल्यामुळे काही प्रमाणात तुमच्या डिव्हाईसची बॅटरी बचत होऊ शकते.
अॅडव्हान्स सर्च
व्हॉट्सअॅपने काही दिवसांपूर्वीच युजर्ससाठी उपलब्ध करून दिलेले हे अत्यंत उपयुक्त आणि उत्तम फीचर आहे. अॅपमध्ये वरच्या उजव्या बाजूला सर्च वर क्लिक करून तुम्ही इतरांना आणि इतरांनी तुम्हाला पाठवलेले फोटोज, व्हिडीओज, ऑडिओज आणि डॉक्युमेंट्स इत्यादी फाइल्स तसंच लिंक्स आणि जीआयएफ एकत्रतपणे पाहू शकता. यामध्ये कोणी कधी कोणती फाइल पाठवली आहे हेसुद्धा तुम्हाला श्रेणीनुसार क्रमाने दिसू शकते.
वाचाः
क्यू आर कोड फॉर न्यू काँटॅक्टस
तुम्हाला तुमच्या फोनमध्ये नवीन काँटॅक्ट अॅड करायचा असेल तर आता नंबर टाइप करत बसायची गरज नाही. व्हॉटसअॅप सेटिंग्जमध्ये जाऊन उजव्या कोपऱ्यातील क्यू आर कोडवर क्लिक करून समोरच्या व्यक्तीचा कोड स्कॅन करून तुम्हाला नवीन काँटॅक्ट अॅड करता येऊ शकतो.
अॅनिमेटेड स्टिकर्स आणि जीआयएफ
हे व्हॉटसअॅपमधील हल्लीच लाँच झालेलं अजून एक आकर्षक फीचर आहे. चॅट बॉक्समध्ये इमोजी आयकॉनवर क्लिक करून इमोजीच्या बाजूलाच तुम्हाला हे दोन पर्याय दिसतील. स्टिकर्समध्ये बरेच आकर्षक स्टिकर्स पॅक व्हॉटसअॅपने उपलब्ध करून दिले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार जीआयएफ आणि स्टिकर निवडून मित्र-मैत्रिणींना पाठवू शकता.
वाचाः
इमोजीस
व्हॉटसअॅपने हल्लीच आपल्या युजर्ससाठी नवीन १३८ इमोजीस उपलब्ध करून दिले आहेत. व्हॉट्सअॅपचा नवीन अपडेट डाऊनलोड करून तुम्ही हे नवीन इमोजीस पाठवू शकता. यामध्ये शेतकरी, शेफ, पेंटर, वकील, शिक्षक, पोलिस इत्यादी आकर्षक इमोजीसचा समावेश करण्यात आला आहे.
स्टेट्स फिचर
व्हॉटसअॅपने हल्लीच जिओ फीचर फोन आणि काही ओएस बेसिक फोन्ससाठीसुद्धा स्टेट्स स्टोरीचे अपडेट उपलब्ध करून दिलेले आहे. किमान किंमतीत व्हॉट्सअॅप फोन वापरण्यासाठी इच्छुक वर्गासाठी हे नक्कीच फायदेशीर अपडेट आहे.
वाचाः
५० जणांसह व्हिडीओ चॅट
काही महिन्यांपूर्वीच मोबाइल युजर्ससाठी व्हॉट्सअॅपने व्हिडीओ कॉल क्षमता ४ वरुन ८ केली. व्हॉट्सअॅप वेब आणि व्हॉटसअॅप फॉर डेस्कटॉप युजर्स आता ५० लोकांसोबत एकाच वेळी व्हिडीओ चॅटद्वारे संवाद साधू शकतील. अॅपमध्येच ‘क्रिएट अ रूम’ हा पर्याय निवडून त्यामध्ये लोकांना अॅड करून व्हॉटसअॅप वेब आणि डेस्कटॉप युजर्स याचा अनुभव घेऊ शकतील.
मल्टी डिव्हाइस सपोर्ट
हे व्हॉटसअॅपच्या आगामी फीचर्समध्ये सर्वाधिक मागणी असलेलं फीचर आहे. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम इ. सोशल नेटवर्किंग अॅप्ससारखा मल्टी डिव्हाइस सपोर्ट व्हॉटसअॅपला अद्यापही नाही. व्हॉट्सअॅप बिटा इन्फोच्या नुकत्याच केलेल्या ट्विटनुसार लवकरच तुम्हाला एक व्हॉट्सअॅप अकाऊंट चार वेगवेगळ्या उपकरणांमध्ये लॉग इन करुन एक्सेस करता येईल. शिवाय, त्या चारही उपकरणांचा डेटा सिंकसुद्धा होईल. युजर प्रोफाइलसाठी विशिष्ट क्यूआर कोड जनरेट करण्यात येईल आणि त्याद्वारे युजरला अकाऊंट व्हेरिफिकेशन करून ही सुविधा वापरता येऊ शकेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पर्मनंट ग्रुप म्यूट
सध्या तुम्ही व्हॉट्सअॅप ग्रुपचे एक वर्षापर्यंत नोटिफिकेशन म्यूट करून ठेवू शकता. पण, लवकरच व्हॉटसअॅप तुम्हाला पर्मनंट ग्रुप म्यूटचा पर्याय उपलब्ध करून देणार आहे. या फीचरची आतुरतेनं वाट पाहणार अनेक युजर्स आहेत. वर्क फ्रॉम होमच्या सध्याच्या वातावरणात अनेक ग्रुप सुपर अॅक्टिव्ह झालेले आहेत. सतत बिझी असणाऱ्या लोकांसाठी ग्रुपचे नोटिफिकेशन अनेकदा त्रासदायक ठरतात. म्हणून आता लवकरच गरज असल्यास तुम्ही पर्मनंट ग्रुप म्यूटचा पर्याय निवडू शकाल.
वाचाः
वाचाः
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times