नवी दिल्लीः गुगलने पुन्हा एकदा कडक पाऊल उचललं आहे. गुगल प्ले स्टोरवरून २४० हून अधिक जास्त मोबाइल अॅप्स ब्लॉक केले आहेत. हे सर्व अँड्रॉयड स्मार्टफोन्सवर चालत होते. त्यामुळे तुमच्या मोबाइलमध्ये हे अॅप्स असतील तर तात्काळ फोनमधून डिलीट करा. गुगलने ही कारवाई यासाठी केली आहे. कारण, २४० अॅप युजर्संना वेगवेगळ्या पद्धतीने जाहिराती दाखवत होते. तसेच गुगलच्या नियमांचे उल्लंघन करीत आहे.

वाचाः

गुगलची सिक्योरिटी टीमने या अॅप्लिकेशन विरोधात कारवाई करीत रस्ता साफ केले आहे. या अॅप्सला ब्लॉक केले आहे. यात सर्वात जास्त अॅप्स RAINBOWMIX ग्रुपचे आहे. ज्यात जुन्या गेम्स सह या ग्रुपच्या अॅप्सला रोज १.४ कोटी लोकांपर्यंत पोहोचले होते. हे पॅक सॉफ्टवेअर च्या द्वारे १.५ कोटी लोकांपर्यंत या जाहिराती पोहोचत होत्या.

वाचाः

युजर्संना होत होता त्रास
गुगलने युजर्सला आव्हान केले आहे की, अँड्रॉयड स्मार्टफोनमधून RAINBOWMIX ग्रुपचे अॅप्स लवकरात लवकर डिलीट करा. हे ग्रुप खूप दिवसांपासून गुगलच्या नियमांचे उल्लंघन करीत आहे. ज्यावेळी शोधकर्त्यांनी White Ops संस्थेच्या मदतीने या स्कॅमचा पर्दाफाश केला. त्यावेळी गुगलने ही मोठी कारवाई केली आहे. ज्या युजर्संना त्रास होत होता. त्या फोनची स्पीड खूप कमी झाली होती. त्यामुळे गुगलने हे अॅप्स ब्लॉक केले आहेत.

वाचाः

मोबाइल अॅड फ्रॉड मोठे आव्हान
गुगल प्ले स्टोरवर याआधी वेळोवेळी खूप साऱ्या अॅप्सला ब्लॉक केले आहे. युजरच्या सुविधेसाठी हे पाऊल उचलले आहे. एक्सपर्ट्सच्या माहितीनुसार, मोबाइल अॅड फ्रॉड इंडस्ट्री समोर मोठे आव्हान आहे. यामुळे युजर्संना मोठे नुकसान सहन करावे लागते. त्यामुळे धोकादायक अॅप्समुळे आवश्यक मोबाइल अॅप्सवरही त्याचा परिणाम होतो. गुगलने यासाठी कडक नियमावली बनवली आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here