वाचाः
६ महिने आणि १२ महिन्याच्या रिचार्जवर कॅशबॅक ऑफर
डीटीएच कंपनी टाटा स्काय या ऑफर अंतर्गत १२ महिन्याचे सब्सक्रिप्शन घेणाऱ्या युजर्सला २ महिन्याचे कॅशबॅक देत आहे. तर ६ महिन्याचे रिचार्ज करणाऱ्या युजर्संना एका महिन्याचे रिचार्ज अमाउंट परत करीत आहे.
वाचाः
७ दिवसांच्या आत मिळणार कॅशबॅक
टाटा स्कायची ही ऑफर ३१ ऑक्टोबर २०२० पर्यंत वैध आहे. ही ऑफर केवळ कंपनी आपल्या वेबसाइटवरून आणि मोबाइल अॅपवरून करण्यात आलेल्या रिचार्जवर देत आहे. कंपनीने सांगितले की, कॅशबॅक अमाउंट सात दिवसांच्या आत युजर्सच्या खात्यात जमा होणार आहे. दोन महिन्याच्या कॅशबॅक प्लानध्ये रिचार्ज केल्यानंतर एका महिन्याचे कॅशबॅक रक्कम ४८ तासांच्या आत तर दुसऱ्या महिन्याचा कॅशबॅक सात दिवसांच्या आत खात्यात जमा होणार आहे.
वाचाः
या बँकेच्या कार्डवर सुद्धा ऑफर
टेलिकॉम टॉकच्या रिपोर्टनुसार, ही ऑफर टाटा स्काय अमाउंटच्या अॅक्टिवेशनच्या दिवशी करण्यात आलेल्या रिचार्जवर उपलब्ध नाही. टाटा स्कायचा असाच एक प्लान बँक ऑफ बडोदाच्या क्रेडिट कार्डवर सुद्धा दिला जात आहे. बँक ऑफ बडोदाच्या कार्डवर ही ऑफर ३० नोव्हेंबर पर्यंत वैध आहे. ऑफर संबंधी अधित डिटेल्स कंपनीच्या वेबसाईटवर दिली आहे.
वाचाः
वाचाः
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times