नवी दिल्लीः देशात फेस्टिव सीजन आता अवघ्या काही दिवसांवर आला आहे. शॉपिंग वेबसाइटवर डील्स आणि ऑफर्सची सुरवात झाली आहे. स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी जबरदस्त सूट देणार असल्याची घोषणा केली आहे. टेलिव्हीजन ब्रँड शिंको ने स्मार्ट टीव्हीवर एक खास ऑफरची घोषणा केली आहे. कंपनी SO328AS (32) मॉडलला अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल सेलमध्ये केवळ ३ हजार २३२ रुपयात विक्री करणार आहे.

वाचाः

जर तुम्हाला स्मार्ट स्पीकरच्या किंमतीत स्मार्ट टीव्ही खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी यासारखी संधी दुसरी नाही. शिंकोने रिलीज पाठवून याची माहिती दिली आहे. ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल मध्ये ३२ इंचाचा SO328AS स्मार्ट टीव्ही केवळ ३ हजार २३२ रुपयांच्या किंमतीत फ्लॅश सेलमध्ये विक्री करणार आहे. फ्लॅश सेल १९ ऑक्टोबर रोजी होणार आहे. शिंकोने या टीव्हीमध्ये युनिवॉल युजर इंटरफेस, अँड्रॉयड८ यासारखे फीचर्स दिले आहेत. याशिवाय, यात HRDP टेक्नॉलजी, 3 HDMI और दो यूएसबी पोर्ट, ए-53 क्वाड-कोर प्रोसेसर, 1 जीबी रॅम व 8 जीबी स्टोरेज, 20 वाट स्पीकर्स, ब्लूटूथ सह अनेक फीचर्स दिले आहेत.

वाचाः

याशिवाय कंपनी ४ के, फुल एचडी आणि एचडी रेडी स्मार्ट टीव्ही आणि एचडी रेडी एलईडी टीव्हीवर सूट देत आहे. कंपनीने नो कॉस्ट ईएमआयची ऑफर सुद्धा दिली आहे. शिंको इंडियाचे फाउंडर अर्जून बजाज यांनी सांगितले की, गेल्या वर्षी आम्ही आमच्या पहिल्या वर्षाच्या वर्धापन दिनी ५५ इंचाचा स्मार्ट टीव्ही केवळ अॅमेझॉन सेलमध्ये ५ हजार ५५५ रुपयात उपलब्ध केला होता. यावर्षी कंपनीची दुसरा वर्धापन दिन आहे. त्यामुळे आम्ही ३२ इंचाचा टीव्ही केवळ ३ हजार २३२ रुपयांत उपलब्ध करणार आहोत.

वाचाः

अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवलमध्ये शिंकोचा ४३ इंच फुल एचडी स्मार्ट टीव्हीला १५ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येवू शकते. या टीव्हीची ओरिजनल किंमत ३१ हजार ९९९ रुपये आहे. तर ४३ इंचाचा ४के टीव्ही ला २१ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येवू शकते. याची ओरिजनल किंमत ३६ हजार ९९९ रुपये आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here