वाचाः
Realme Q2, Pro, Realme Q2i ची किंमत
रियलमी क्यू २ च्या ४ जीबी रॅम प्लस १२८ जीबी इनबिल्ट स्टोरेजच्या फोनची किंमत १२९९ चिनी युआन म्हणजेच १४ हजार २०० रुपये आहे. तर ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १३९९ चिनी युआन म्हणजेच १५ हजार २०० रुपये आहे. हा फोन ब्लू आणि सिल्वर कलरमध्ये येतो.
वाचाः
रियलमी क्यू२ प्रोच्या ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजची किंमत १७९९ चिनी युआन म्हणजेच १९ हजार ६०० रुपये आहे. तर ८ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १९९९ चिनी युआन म्हणजेच २१ हजार ८०० रुपये आहे. रियलमी क्यू २ आणि रियलमी क्यू २ प्रो फोनची विक्री चीनमध्ये १९ ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे. रियलमी क्यू२ आय या फोनची किंमत ११९९ युआन म्हणजेच १३ हजार रुपये आहे. या फोनची प्री बुकिंग २१ ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे.
वाचाः
Realme Q2 ची वैशिष्ट्ये
रियलमी क्यू२ मध्ये ६.५ इंचाचा फुल एचडी प्लस (1080×2400 पिक्सल) डिस्प्ले आहे. फोनमध्ये मीडियाटेक डाइमेंसिटी 800U प्रोसेसर दिला आहे. हँडसेट ६ जीबी रॅम सोबत येतो. या फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सोबत २ मेगापिक्सलचा सेन्सर दिला आहे. फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 5000mAh बॅटरी दिली आहे.
वाचाः
Realme Q2 Pro ची वैशिष्ट्ये
या फोनमध्ये ६.४ इंचाचा फुल एचडी प्लस अमोलेड डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये डाइमेंसिटी 800U प्रोसेसर दिला आहे. फोनमध्ये ८ जीबी रॅम दिला असून १२८ जीबी आणि २५६ जीबी इनबिल्ट स्टोरेज पर्याय दिले आहेत. फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 4300mAh बॅटरी दिली आहे. ६५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे.
वाचाः
Realme Q2i ची वैशिष्ट्ये
या फोनमध्ये ६.५ इंचाचा डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये मीडियाटेक डाइमेंसिटी 720 प्रोसेसर दिला आहे. हा फोन ४ जीबी रॅम प्लस २८ जीबी इनबिल्ट स्टोरेज सोबत येतो. रियलमीच्या या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनमध्ये १३ मेगापिक्सलचा प्रायमरी, मायक्रो आणि डेप्थ सेन्सर दिला आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 5000mAh बॅटरी दिली आहे. १८ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो. हँडसेटमध्ये रियरवर फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे.
वाचाः
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times