नवी दिल्लीः Samsung ने अखेर आपला स्वस्त ५जी स्मार्टफोन गॅलेक्सी ए४२ लाँच केला आहे. या फोनला खास या लोकांसाठी बाजारात उतरवले आहे. ज्यांना स्वस्तात ५जी फोनची गरज आहे. सॅमसंगच्या सर्व प्रीमियम फोनला आता ५ जी सपोर्ट मिळतो आहे. गॅलेक्सी ए४२ ५जी फोनचे वैशिष्ट्ये काही दिवसांपूर्वीच सार्वजनिक केले आहेत.

वाचाः

Samsung Galaxy A42 5G ची किंमत
या फोनला ३३ हजार ४०० रुपयांत लाँच केले आहे. फोनची विक्री ब्रिटनमध्ये ६ नोव्हेंबर पासून सुरू होणार आहे. हँडसेटमला यूरोपच्या दुसऱ्या बाजारात सुद्धा विक्रीसाठी उपलब्ध केले जाणार आहे. याआधी कंपनीने अमेरिकेत या वर्षी गॅलेक्सी ए५१ ५जी ला ४९९ डॉलर जवळपास ३६ हजार ६०० रुपयात लाँच केले होते. सॅमसंगचा हा फोन प्रिज्म डॉट ब्लॅक, प्रिज्म डॉट व्हाइट आणि प्रिज्म डॉट ग्रे रंगात उपलब्ध केले आहे.

वाचाः

फोनचे फीचर्स
हा फोन गॅलेक्सी एम सीरीजच्या लेटेस्ट स्मार्टफोनसारखा दिसतो. यात एका बाजुला ड्यूड्रॉप कटआउट आहे. बॅक पॅनेलवर एक स्वॉयर शेप कॅमेरा मॉड्यूल आहे ज्यात चार सेन्सर दिले आहे. सॅमसंगच्या या फोनमध्ये ६.६ इंचाचा एचडी प्लस सुपर अमोलेड इनफिनिटी यू डिस्प्ले दिला आहे. एचडी प्लस रिझॉल्यूशन दिला आहे. हा स्मार्टफोन ऑन स्क्रीन फिंगरप्रिंट सेन्सर सपोर्ट आहे. फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ७५० जी प्रोसेसर दिला आहे. हा फोन ४ जीबी, ६ जीबी व ८ जीबी सोबत येतो. हँडसेटमध्ये १२८ जीबी इनबिल्ट स्टोरेज दिला आहे.

वाचाः

सॅमसंगच्या या फोनमध्ये चार रियर कॅमेरे दिले आहेत. यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड अँगल, ५ मेगापिक्सलचा डेप्थ आणि ५ मेगापिक्सलचा मायक्रो सेन्सर दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 5000mAh बॅटरी दिली आहे. १५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट करते.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here