नवी दिल्लीः प्रीमियम टेक ब्रँड अॅपलकडून एका व्हर्च्यूअल इव्हेंटमध्ये नवीन आयफोन १२ लाइनअप वरून पडदा हटवला आहे. इव्हेंटमध्ये चार नवीन आयफोन १२ मॉडल्स iPhone 12, , आणि लाँच केले आहेत. या सर्व फोन्सची भारतातील किंमत सुद्धा समोर आली आहे. भारतातील किंमत यूएसपेक्षा जास्त आहे.

वाचाः

iPhone 12 Mini
सर्वात छोटा ५जी आयफोनचा ६४ जीबी मॉडलची किंमत ६९ हजार ९०० रुपये आणि १२८ जीबी मॉडलची किंमत ७४ हजार ९०० रुपये ठेवण्यात आली आहे. तसेच याच्या २५६ जीबी मॉडलची किंमत ८४ हजार ९०० रुपये ठेवली आहे. हा फोन व्हाईट, ब्लॅक, ब्लू, ग्रीन आणि PRODUCT रेड कलर्स मध्ये उतरवले आहेत. यूएसमध्ये आयफोन १२ मिनीची सुरुवातीची किंमत ६९९ डॉलर म्हणजेच ५१ हजार ३०० रुपये ठेवली आहे.

वाचाः

iPhone 12
स्टँडर्ड iPhone 12 च्या ६४ जीबी स्टोरेजच्या मॉडलची किंमत ७९ हजार ९०० रुपये आणि १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ८४ हजार ९०० रुपये आहे. याच्या टॉप ऑफ द लाइन २५६ जीबी मॉडलची किंमत ९४ हजार ९०० रुपये आहे. आयफोन १२ ला ब्लॅक, ब्लू, ग्रीन आणि व्हाइट तसेच PRODUCT रेड कलर उपलब्ध करण्यात आला आहे. यूएस मार्केटमध्ये आयफोन १२ ची किंमत ७९९ रुपये म्हणजेच ५८ हजार ६०० रुपये आहे.

iPhone 12 Pro
नवीन iPhone 12 Pro च्या १२८ जीबी मॉडलची किंमत १ लाख १९ हजार ९०० रुपये आणि २५६ जीबी मॉडलची किंमत १ लाख २९ हजार ९०० रुपये ठेवली आहे. iPhone 12 Proच्या ५१२ जीबी मॉडलची किंमत १ लाख ४९ हजार ९०० रुपये ठेवली आहे. या फोनला ग्रेफाइट, सिल्वर, गोल्ड आणि पॅसिफिक ब्लू कलर्स मध्ये मिळणार आहे. या फोनची यूएसमध्ये किंमत ९९९ डॉलर म्हणजेच ७३ हजार रुपये सुरुवातीला ठेवली आहे.

वाचाः

iPhone 12 Pro Max
भारतात iPhone 12 Pro Max च्या १२८ जीबी मॉडलची किंमत १ लाख २९ हजार ९०० रुपये आणि २५६ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १ लाख २९ हजार रुपये ठेवली आहे. तर ५१२ जीबी मॉडलची किंमत १ लाख ५९ हजार रुपये ठेवली आहे. सर्वात पॉवरफुल iPhone 12 Pro Maxची किंमत यूएसमध्ये १०९९ डॉलर म्हणजेच ८० हजार ६०० रुपये ठेवली आहे.

भारतात किंमत जास्त का
केवळ आयफोन १२ लाइनअप फोन नव्हे तर सर्व आयफोन्सचे यूएस आणि भारतातील किंमतीत मोठा फरक आहे. अॅपल आपला फोन भारतात बनवत नाही. तयार आयफोन फोन आयात करावा लागतो. त्यामुळे टॅक्स आणि आयात ड्यूटी प्रत्येक युनिटवर लावली जाते. तसेच बाकीचा खर्च सुद्धा असतो. त्यामुळे यूएसच्या तुलनेत भारतात आयफोनच्या किंमती महाग असतात.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here