नवी दिल्लीः फेस्टिव सीजनमध्ये सॅमसंगने आपला जबरदस्त स्मार्टफोन च्या किंमतीत कपात केली आहे. आता हा फोन २७ हजार ९९९ रुयपांत खरेदी करता येईल. सॅमसंगने मंगळवारी ट्विट करून ही माहिती दिली आहे. या फोनच्या किंमतीत १५०० रुपयांची कपात करण्यात आली आहे. आधी हा फोन २९ हजार ४९९ रुपयांत मिळत होता.

वाचाः

याआधीही किंमत कमी झाली आहे
सॅमसंग गॅलेक्सी ए ७१ लाँच झाल्यानंतर ही दुसऱ्यांदा किंमत कमी करण्यात आली आहे. याआधी याची किंमत ५०० रुपयांनी कमी करण्यात आली होती. सॅमसंगने ६४ मेगापिक्सलच्या या फोनला २९ हजार ९९९ रुपयांत लाँच केले होते.

वाचाः

सिंगल स्टोरेज ऑप्शन ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज सोबत लाँच करण्यात आलेल्या या फोनने भारतीय बाजारात मिड रेंज स्मार्टफोनमध्ये आपली जागा बनवली होती. सॅमसंगची ए सीरीज स्मार्टफोन सीरीज खूप प्रसिद्ध आहे.

वाचाः

Samsung Galaxy A71 ची वैशिष्ट्ये
या फोनमध्ये ६.७ इंचाचा सुपर अमोलेड डिस्प्ले इनफिनिटी ओ डिस्प्ले दिला आहे. याचा डिस्प्ले रिजॉल्यूशन 1080×2400 पिक्सल आहे. क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ७३० ऑक्टाकोर प्रोसेसरच्या स्मार्टफोनमध्ये 4500mAh बॅटरी दिली आहे. तसेच २५ वॉट सुपर फास्ट चार्जिंग दिली आहे. या फोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा दिला आहे. ६४ मेगापिक्सलचा कॅमेरा, १२ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड १२३ डिग्री फिल्ड ऑफ व्ह्यू सोबत येतो. या फोनमध्ये ५ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स आणि रियर कॅमेरा ५ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. ३२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here