वाचाः
आयफोन ११ ची किंमत
१३ हजार ४०० रुपयांनी स्वस्त झाल्यानंतर आयफोन ११ च्या ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत आता ५४ हजार ९०० रुपये झाली आहे. स्मार्टफोनला ६८ हजार ३०० रुपयांत लाँच केले होते. याचप्रमाणे आयफोन ११ चा १२८ जीबी मॉडलची किंमत ५९ हजार ९०० रुपये, २५६ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ६९ हजार ९०० रुपये झाली आहे. नवीन किंमती कंपनीने आपल्या वेबसाईटवर अपडेट केल्या आहेत.
वाचाः
iPhone SE आणि XR ची किंमत
नवीन iPhone SE आणि XR च्या किंमतीत २६०० रुपये आणि ४६०० रुपये कमी केले आहेत. आयफोन एसईच्या ६४ जीबी मॉडलची किंमत ३९ हजार ९०० रुपये, १२८ जीबी स्टोरेजच्या मॉडलची किंमत ४४ हजार ९०० रुपये आणि २५६ जीबी मॉडलची किमत ५४ हजार ९०० रुपये झाली आहे. त्याचप्रमाणे एक्सआरच्या ६४ जीबी मॉडलची किंमत ४७ हजार ९०० रुपये आणि १२८ जीबी मॉडलची किंमत ५२ हजार ९०० रुपये झाली आहे.
वाचाः
५४ हजार ९०० रुपयांत आयफोन ११ जबरदस्त डील
अॅपलने घोषणा केली आहे की, अॅपल ई-स्टोर वरून आयफोन ११ खरेदी केल्यानंतर एयरपॉड्स फ्रीमध्ये मिळणार आहे. सर्वात कमी किंमतीच्या एयरपॉड्सची किंमत सुद्धा १४ हजार ९०० रुपये आहे. आयफोनची किंमत ४० हजार रुपये होते. जर तुम्हाला एअरपॉड्स घ्यायचा नसेल तर अॅमेझॉन किंवा फ्लिपकार्टवरून फोन खरेदी करता येवू शकतो. या ठिकाणी ६४ जीबी मॉडलची किंमत ५० हजारांपेक्षा कमी आहे.
वाचाः
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times