नवी दिल्लीः सॅमसंगने एक स्पेशल एडिशन स्मार्टफोन गॅलेक्सी M31 Prime लाँच केला आहे. फेस्टिव सीजन डोळ्यासमोर ठेवून या फोनला लाँच करण्यात आल्याचे कंपनीने सांगितले. कंपनीने अॅमेझॉन सोबत मिळून हा फोन तयार केला आहे. स्मार्टफोन सोबत ३ महिन्याची प्राईम मेंबरशीप फ्री दिली जात आहे. याची विक्री अॅमेझॉनर १७ ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे. प्राईम मेंबर १६ ऑक्टोबरपासू हा फोन खरेदी करू शकतील.

वाचाः

स्मार्टफोनची किंमत
गॅलेक्सी M31 Primeला एकाच व्हेरियंटमध्ये आणले आहे. याची किंमत १६ हजार ४९९ रुपये ठेवण्यात आली आहे. प्राईम मेंबर्सला १ हजार रुपयांचे Apay कॅशबॅक दिले जाणार आहे. तसेच या सेलमध्ये HDFC क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डधारकांना १० टक्के अतिरिक्त कॅशबॅक दिला जाणार आहे. स्मार्टफोन तीन कलर मध्ये ओशन ब्लू, स्पेस ब्लॅक आणि आईसबर्ग ब्लू मध्ये येतो.

वाचाः

फोनची वैशिष्ट्ये
स्मार्टफोनमध्ये ६.४ इंचाचा नफिनिटी यू sAMOLED डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज दिला आहे. सोबत सॅमसंग Exynos 9611 प्रोसेसर दिला आहे. स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने ५१२ जीबी पर्यंत वाढवता येवू शकते. फोटोग्राफीसाठी यात क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे.

वाचाः

रियर कॅमेऱ्यात ६४ मेगापिक्सलचा प्रामयरी सेन्सर, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा, ५ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स, ५ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी ३२ मेगापिक्लसलचा कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 6000mAh बॅटरी दिली आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here