नवी दिल्लीः शाओमीने अखेर आपली मी १० सीरीज स्मार्टफोन भारतात लाँच केली आहे. सीरीज अंतर्गत आणि स्मार्टफोन आणले आहेत. कंपनीच्या फ्लॅगशीप डिव्हाईसेज आहे. या स्मार्टफोन्सला गेल्या महिन्यात यूरोपमध्ये लाँच करण्यात आले होते. मी १० टी प्रो दोन्हीमध्ये सर्वात पॉवरफुल फोन आहे. ज्यात १०८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा दिला आहे. या दोन्ही स्मार्टफोनमध्ये ५ जी सपोर्ट दिला आहे. तसेच अनेक जबरदस्त फीचर्स दिले आहेत.

वाचाः

Mi 10T आणि Mi 10T Pro ची भारतात किंमत
शाओमीचा मी १० टी स्मार्टफोन दोन व्हेरियंटमध्ये येतो. फोनला ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजची किंमत ३५ हजार ९९९ रुपये तर ८ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ३७ हजार ९९९ रुपये आहे. हा स्मार्टफोन कॉस्मिक ब्लॅक, आणि लूनर सिल्वर कलरमध्ये येतो.

वाचाः

मी १० प्रो केवळ एकाच व्हेरियंटमध्ये म्हणजेच ८ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेजमध्ये आणले आहे. याची किंमत ३९ हजार ९९९ रुपये आहे. हा स्मार्टफोन अरॉर ब्लू, कॉस्मिक ब्लॅक आणि लूनर सिल्वर मध्ये येतो. दोन्ही स्मार्टफोनला फ्लिपकार्ट आणि mi.com वरून प्री-ऑर्डर केले जावू शकते. या फोनच्या खरेदीवर ३ हजार रुपयांचा कॅशबॅक ऑफर देण्यात येते.

वाचाः

दोन्ही फोन्सचे वैशिष्ट्ये
Mi 10T आणि Mi 10T Pro मध्ये अनेक गोष्टी समान आहे. दोन्ही फोनमध्ये 144Hz रिफ्रेश रेटचा ६.६७ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. याच्या प्रोटेक्शनसाठी गोरिला ग्लास ५ दिला आहे. यात क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८६५ प्रोसेसर, २० मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आणि 5,000mAh ची बॅटरी दिली आहे. ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे.

वाचाः

या दोन्ही सर्वात मोठा फरक म्हणजे रियर कॅमेराचा आहे. मी १० टी च्या रियरमध्ये ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, १३ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड लेन्स आणि ५ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स दिला आहे. तर मी १० टी प्रो मध्ये १०८ मेगापिक्सलचा सेन्सर, १३ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड लेन्स आणि ५ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स दिला आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here