नवी दिल्लीः फेस्टिव सीजन पाहून दिग्गज स्मार्टफोन कंपनी अॅपलने दिवाळी ऑफरची घोषणा केली होती. कंपनीने ही ऑफर सुरू केली परंतु, अवघ्या काही तासांत आउट ऑफ स्टॉक झाली आहे. अॅपलने ऑफर अंतर्गत Apple Store वरून स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना देण्याची घोषणा केली होती. कंपनीची ही ऑफर १७ ऑक्टोबरच्या रात्री १२ वाजता सुरू झाली होती. परंतु, काही तासात ती संपली.

वाचाः

आयफोन १२ च्या लाँचिंग नंतर अॅपलने आयफोन ११ च्या किंमतीत १३ हजार ४०० रुपयांची कपात केली आहे. तसेच आयफोन ११ सोबत मिळत असलेल्या एअरपॉड्सची किंमत १४ हजार ९०० रुपये आहे. स्मार्टफोन मध्ये ड्यूल रियर कॅमेरा, ६.१ इंचाचा डिस्प्ले आणि वायरलेस चार्जिंग यासारखे फीचर्स मिळत आहेत.

वाचाः

आयफोन ११ ची किंमत
अॅपलने आयफोन ११ स्मार्टफोन ला ६८ हजार ३०० रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच केले होते. किंमतीत कपात करण्यात आल्यानंतर या फोनचा ६४ जीबी मॉडलची किंमत ५४ हजार ९०० रुपये झाली होती. तसेच या फोनच्या १२८ जीबी मॉडलची किंमत ५९ हजार ९०० रुपये आणि २५६ जीबी मॉडलची किंमत ६९ हजार ९०० रुपये झाली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार काही तासात ऑफर अंतर्गत सर्वच्या सर्व फोन विकले गेले आहेत.

वाचाः

अॅमेझॉन सेलमध्ये जबरदस्त डिस्काउंट
आयफोन ११ स्मार्टफोनवर अॅमेझॉन सेलमध्ये जबरदस्त डिस्काउंट ऑफर केले जात आहे. फोनच्या ६४ जीबी मॉडलची किंमत या सेलमध्ये ४८ हजार ९९९ रुपये आहे. तसेच एचडीएफसी कार्ड धारकांना अतिरिक्त कॅशबॅक ऑफर केले जात आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here