नवी दिल्लीः अॅमेझॉनवर ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल सुरू आहे. या सेलमध्ये प्रसिद्ध स्मार्टफोन्सवर सर्वात कमी किंमतीत जबरदस्त डिल्ससोबत खरेदी करता येवू शकते. जर तुम्हाला फेस्टिव सीजनमध्ये एक नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर हा सेल तुमच्यासाठी खास आहे.

वाचाः

वनप्लस 7T प्रो
वनप्लसच्या या प्रसिद्ध स्मार्टफोनला ५३ हजार ९९९ रुपयांऐवजी ४३ हजार ९९९ रुपये किंमतीत खरेदी करता येवू शकते. लिमिटेड ऑफर अंतर्गत फोनला एक्सचेंज घेतल्यास ३ हजार रुपयांचा फायदा होवू शकतो. या सेलमध्ये नो कॉस्ट ईएमआय पर्याय सुद्धा उपलब्ध आहे. ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी इंटरनल स्टोरेजच्या या फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे.

विवो V17
अॅमेझॉन ग्रेट इंडियन सेलमध्ये या फोनवर १० हजारांची सूट दिली जात आहे. सूटनंतर २७ हजार ९९० रुपयांचा फोन १७ हजार ९९० रुपयांत खरेदी करता येवू शकतो. हा फोन वेगाने आउट ऑफ स्टॉक होत आहे. फोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा सेल्फी आणि ४८ मेगापिक्सलचा क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी इंटरनल स्टोरेजचा फोन स्वस्त किंमतीत मिळत आहे.

वाचाः

नोकिया ५.३
४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या या फोनला आज १६ हजार ५९९ रुपयांऐवजी १२ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येवू शकते. एक्सचेंज ऑफरमध्ये या फोनला खरेदी केल्यास ११ हजार ९५० रुपयांपर्यंत आणखी फायदा होऊ शकतो. सेलमध्ये नो कॉस्ट ईएमआय पर्याय उपलब्ध आहे.

ओप्पो A5 2020
ओप्पोचा हा जबरदस्त स्मार्टफोन आज ५ हजार रुपयांच्या सूट सोबत खरेदी करता येवू शकतो. सूटनंतर या फोनची किंमत १४ हजार ९९० रुपये कमी होऊन ९९९० रुपये झाली आहे. एक्सचेंज ऑफर मध्ये हा फोन ९०५० रुपयांच्या डिस्काउंट सोबत उपलब्ध आहे. आजच्या या सेलमध्ये हा फोन नो कॉस्ट ईएमआय वर सुद्धा खरेदी करता येवू शकते.

वाचाः

ऑनर 9A
३ जीबी रॅम प्लस ६४ जीबी इंटरनल स्टोरेजचा हा फोन ११ हजार ९९९ रुपयांऐवजी ९९९९ रुपयात खरेदी करता येवू शकतो. फोनला एक्सचेंज ऑफर अंतर्गत तुम्हाला ९०५० रुपयांपर्यंत फायदे मिळू शकते. फोनला नो कॉस्ट ईएमआय वर उपलब्ध करण्यात आले आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here