नवी दिल्लीः जगातील सर्वात महाग असलेल्या टीव्ही पैकी एक असलेल्या च्या Model RX ची विक्री सुरू झाली आहे. या टीव्हीची किंमत पाहून तुम्ही हैराण व्हाल. एलजी कंपनीची खास टीव्ही एलजी सिग्नेचर ओलेड टीव्ही आर ची किंमत १०० मिलियन वोन म्हणजेच जवळपास ६३ लाख रुपये आहे. ६५ इंचाचा या टीव्हीची किंमत आधी ४४ लाख रुपये होती. परंतु, याचा सेल सुरू होताच टीव्हीची किंमत ६३ लाख रुपये झाली आहे.

वाचाः

या टीव्हीचा डिस्प्ले फ्लेक्सिबल आहे. म्हणजेच एक ब्रश्ड अॅल्यूमिनियम केसिंग स्पीकरमधून निघतो. तसेच रिमोटच्या मदतीने टीव्ही पाहिल्यानंतर केसिंगच्या आत इन्सर्ट करू शकता. एलजीचा हा दावा आहे की, या टीव्हीला तुम्ही ५० हजार वेळा रोलअप करू शकता. म्हणजेच टीव्हीला आत बाहेर करू शकता. याला रोलअप होण्यासाठी केवळ १० सेकंद लागतात.

वाचाः

या टीव्हीची पिक्चर क्वॉलिटी पाहिल्यास यात सेल्फ लायटिंग पिक्सल टेक्नोलॉजी देण्यात आली आहे. या टीव्हीची पिक्चर क्वॉलिटी अविश्वसनीय आहे. यात १०० वॉटचा डॉल्बी एटमॉस साउंड सिस्टम दिला आहे.

वाचाः

LG Signature OLED TV R च्या बाकीच्या फीचर्समध्ये एकापेक्षा एक फीचर्स दिले आहेत. टीव्हीच्या काही भागात तुम्ही चित्रपट पाहू शकता. तसेच खालच्या काही भागात तुम्ही टाइम, वेदर अपडेट्स, आणि ब्रेकिंग न्यूज वैगरे पाहू शकाल. त्यासाठी सेटिंगमध्ये जावून तुम्हाला थोडा बदल करावा लागणार आहे. टीव्ही फोल्डेबल फोन किंवा डबल स्क्रीनच्या लॅपटॉप प्रमाणे असणार आहे. एलजीने या टीव्हीची विक्री सध्या साउथ कोरियात ६ स्टोर वरून सुरू केली आहे. तसेच आगामी काळात जगातील अनेक भागात याची विक्री सुरू करण्यात येईल, अशी शक्यता आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here