नवी दिल्लीः भारत जगातील सर्वात मोठा स्मार्टफोन मार्केट्स मध्ये सहभागी आहे. नुकत्याच समोर आलेल्या एका अभ्यासानुसार, कोणत्या ब्रँड्चे स्मार्टफोन्स खरेदी करण्याला पसंती देतात. टॉप पोझिशनवर आहे. यात सर्वात मोठे मार्केट शाओमीकडे आहे. या वर्षीच्या तिसऱ्या तिमाहीत शाओमीने सर्वात जास्त फोनची विक्री केली आहे. जवळपास १ कोटी ३० लाख शाओमी स्मार्टफोन्स ऑगस्ट ते ऑक्टोबर या दरम्यान विकले आहेत. स्मार्टफोन संबंधी डेटा Canalysकडून शेयर करण्यात आला आहे.

वाचाः

शाओमीचे मार्केट शेयर जुलै ते ऑक्टोबर च्या तिमाहीत २६.१ टक्के राहिले आहे. जे गेल्या वर्षीच्या तुलनेत १.१ टक्के जास्त आहे. याशिवाय, दुसऱ्या स्थानावर दक्षिण कोरियाची स्मार्टफोन कंपनी सॅमसंग आहे. सॅमसंगने १ कोटी डिव्हाइसेजची विक्री केली आहे. तसेच २०.४ टक्के मार्केट शेयरवर कब्जा मिळवला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत कंपनीचे शेयर मार्केट ०.२ टक्के कमी झाले आहे.

वाचाः

रियलमीची सर्वात जास्त ग्रोथ
टॉप ३ स्मार्टफोन ब्रँड्समध्ये विवोचा समावेश आहे. यावर्षीच्या तिसऱ्या तिमाहीत जवळपास ८८ लाख डिव्हाईसेजची सेल केली आहे. १७.६ टक्के मार्केट शेयरवर कंपनीने कब्जा केला आहे. याशिवाय चौथ्या पोझीशनवर रियलमी आहे. रियलमीचे मार्केट शेयर गेल्या वर्षीच्या तुलनेत १५.३ टक्क्यांच्या तुलनेत वाढून ते १७.४ टक्के झाले आहे. कंपनीची ग्रोथ जवळपास २ टक्के राहिली आहे. जी मार्केटमध्ये सध्या सर्वात जास्त आहे.

वाचाः

अॅपल आयफोन्सची विक्री वाढली
पाचव्या स्थानावर ओप्पो राहिला आहे. जवळपास ६१ लाख स्मार्टफोन्सची विक्री केली आहे. ओप्पोचे मार्केट शेयर जवळपास १२.१ टक्के राहिले आहे. केवळ पाच स्मार्टफोन बनवलेले असून ते जवळपास ९३.६ टक्के इंडियन मार्केट कंट्रोल करीत आहे. खास वैशिष्ट्ये म्हणजे आयफोनची मागणी भारतात वाढली आहे. या तिमाहीत अॅपलने जवळपास ८ लाख आयफोनची भारतात विक्री केली आहे. कॅलिफोर्नियाची कंपनीला प्रमोशनल ऑफर्स आणि भारतात ऑनलाइन स्टोर उघडण्याचा फायदा झाला आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here