नवी दिल्लीः देशातील दिग्गज स्मार्टफोन कंपनी शाओमी इंडियाने फेस्टिव सीजनमध्ये कमाल केली आहे. कंपनीने ५० लाखांहून जास्त स्मार्टफोनची विक्री केली आहे. शाओमीला ऑनलाइन शॉपिंग वेबसाईट अॅमेझॉनच्या ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल आणि फ्लिपकार्टवर आयोजित करण्यात आलेला बिग बिलियन डेज सेलचा खूप मोठा फायदा मिळाला आहे. तसेच शाओमीने ग्राहकांसाठी स्वतः Diwali With Mi सेलचे आयोजन केले होते.

वाचाः

या स्मार्टफोन्सवर मिळाली सूट
कंपनीने सेल दरम्यान आपल्या काही स्मार्टफोन्सवर डिस्काउंट ऑफर दिला होता. शाओमीच्या प्रीमियम फ्लॅगशीप Mi 10 च्या १२८ जीबी व्हेरियंटला ४४ हजार ९९९ रुपये आणि २५६ जीबी व्हेरियंटला ४९ हजार ९९९ रुपयांत खरेदी केले जावू शकत होते.

वाचाः

याच प्रमाणे रेडमी नोट ९ आणि रेडमी नोट ९ प्रो मॅक्स स्मार्टफोनवर १ हजार रुपयांचा डिस्काउंट दिला जात होता. तसेच रेडमी नोट ९ प्रो वर कंपनी १५०० रुपयांपर्यंत अतिरिक्त डिस्काउंट देत होती. शाओमीचा दिवाली विद मी सेल दरम्यान अॅक्सिस बँक आणि बँक ऑफ बडोदा ग्राहकांना ईएमआयची सुविधा दिली जात होती.

वाचाः

तिमाहीत विकले १.३० कोटी फोन
एका ताज्या रिपोर्टमधून आलेल्या माहितीनुसार, शाओमीने ऑगस्ट ते ऑक्टोबर पर्यंत तिमाहीत जवळपास १ कोटी ३० लाख स्मार्टफोन्सची विक्री केली आहे. याच पद्धतीने शाओमी पुन्हा एकदा देशाती सर्वात मोठी फोन विक्रेता कंपनी बनली आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here