नवी दिल्लीः गणराज्य दिनानिमित्त (२६ जानेवारी) फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनवर स्मार्टफोन कंपन्यांनी बंपर सेलची सुरुवात केली आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन पासून लॅपटॉप पर्यंत अनेक उत्पादने स्वस्तात खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे. १९ जानेवारी पासून सुरू होणाऱ्या सेलमध्ये मोबाइल कंपन्यांनी खास ऑफर्स आणल्या आहेत. १९ जानेवारी ते २२ जानेवारी पर्यंत फ्लिपकार्टवर सुरू होणाऱ्या रिपब्लिक डे सेलमध्ये मोटोरोलाच्या स्मार्टफोन्सवर ५ हजारांपर्यंत सूट मिळणार आहे.

या सेलमध्ये मोटोरोलाच्या फोनवर कोटक आणि आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्डच्या पेमेंटवर १० टक्के सूट मिळणार आहे. म्हणजेच १५०० रुपयांची सूट ग्राहकांना मिळणार आहे. या फोनची किंमत १३ हजार ९९९ रुपये आहे. परंतु, या सेलमध्ये हा फोन ८ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येऊ शकणार आहे. या फोनमध्ये ड्युअल सिम सपोर्टसह अँड्रॉयड पाय ९.० मिळेल. या फोनमध्ये ६.३ इंचाचा फुल एचडी प्लस आयपीएस डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच फोनमध्ये सॅमसंगचा एक्सिनॉज ९६०९ प्रोसेसर आहे. एक ऑक्टाकोर प्रोसेसर आहे. या फोनमध्ये ग्राफिक्ससाठी माली जी७२ एमपी३ जीपीयू आणि ४ जीबी रॅम आहे. मोटोरोला वन अॅक्शनमध्ये १२८ जीबी स्टोरेज आहे यात ट्रिपल रियर कॅमेऱ्याचा सेटअप देण्यात आला आहे. यात १२ मेगापिक्सलचा, दुसरा २ मेगापिक्सलचा तर तिसरा ५ मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. या रियर कॅमेऱ्याचे वैशिष्ट्ये म्हणजे वर्टिकल स्थितीत सुद्धा लॅडस्कॅप व्हिडिओ रेकॉर्ड केला जाऊ शकतो. फोनमध्ये १२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

या फोनची किंमत १९ हजार ९९९ रुपये आहे. परंतु, फ्लिपकार्टवर रिपब्लिक डे सेलमध्ये हा फोन केवळ १३ हजार ९९९ रुपये आहे. फोनमध्ये पंचहोल डिस्प्ले आहे. या फोनमध्ये ४ जीबी रॅम सह १२८ जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. मेमरी कार्डच्या मदतीने ५१२ जीबी पर्यंत ती वाढवता येऊ शकते.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here