नवी दिल्ली : सॅमसंग आणखी एक मध्यम किंमतीचा फ्लॅगशिप स्मार्टफोन आणण्याच्या तयारीत आहे. कंपनी सध्या Galaxy Note 10 Lite आणि Galaxy S10 Lite हे दोन्ही फ्लॅगशिप फोन मध्यम किंमतीत देत आहे. याशिवाय लवकरच A सीरिज येण्याची शक्यता आहे. गॅलक्सी A51 हा स्मार्टफोन फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात भारतात लाँच होऊ शकतो. काही वृत्तांनुसार, या फोनमध्ये दोन रॅम आणि दोन स्टोरेज व्हेरिएंट्स असतील. शिवाय या फोनची किंमतही २३ हजार रुपयांच्या आसपास असू शकते.

२३ हजार रुपयांपासून किंमत सुरू होत असली तरी टॉप एंड व्हेरिएंट जवळपास २५ हजार रुपयांच्या आसपास असेल. कंपनीने ए सीरिजचे गॅलक्सी A५१ आणि गॅलक्सी A७१ हे फोन लॉस वेगासमध्ये झालेल्या सीईएस २०२० मध्ये शोकेस केले होते. सॅमसंग इंडियाच्या वेबसाईटवरही या फोनचे फोटो टीझ करण्यात आले आहेत.

फ्लॅगशिप फोन असल्यामुळे ग्राहकांना यामध्ये अनेक आकर्षक फीचर्स मिळणार आहेत. गॅलक्सी A५१ मध्ये ६.५ इंच आकाराचा O AMOLED FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. याशिवाय Exynos 9611 प्रोसेसर, ४ जीबी आणि ६ जीबी रॅम, ६४ आणि १२८ जीबी स्टोरेज हे पर्याय मिळतील. या फोनमध्ये ४०००mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. कनेक्टिव्हीटीसाठी ३.५ एमएम जॅक आणि ड्युअल सिम सपोर्टही असेल. यात ४८+५+५+१२ मेगापिक्सेल असा कॅमेरा सेअटप देण्यात आला आहे. सेल्फीसाठी ३२ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा मिळेल.

सॅमसंग गॅलक्सी ए ५१ सोबतच या सीरिजमधील गॅलक्सी ए ७१ हा फोनही लाँच केला जाण्याची शक्यता आहे. या स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशनही समोर आले आहेत. यामध्ये अगोदरच्या तुलनेत मोठ्या आकाराचा डिस्प्ले (६.७ इंच) देण्यात आला आहे. क्वाड कॅमेरा सेटअपमध्येही बदल करण्यात आलाय. हा फोन आता ६४ मेगापिक्सेल प्रायमरी सेन्सरसह मिळेल. फोनच्या क्वाड कॅमेरामध्ये ६४MP+१२MP+५MP+५MP असा सेटअप देण्यात आला आहे. दोन्ही फोनमध्ये अँड्रॉईड ओएस बेस्ट सॅमसंग यूआय सिस्टम आहे.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

1 COMMENT

  1. Hi, just required you to know I he added your site to my Google bookmarks due to your layout. But seriously, I believe your internet site has 1 in the freshest theme I??ve came across. Onwin engelsiz giriş adresi ile 7/24 siteye butonlarımıza Tiklayip erişim sağlayabilir ve Onwin üyelik işlemini 3 dakika da halledebilirsiniz.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here