नवी दिल्लीः Honor ने सौदी अरब मध्ये आपला नवीन हँडसेट ऑनर 10एक्स लाइट लॉन्च केला आहे. नवीन मध्ये गूगल मोबाइल सर्विसेज (GMS) मिळत नाही. फोनमध्ये 5000mAh बॅटरी आणि ४८ मेगापिक्सलचा क्वॉड कॅमेरा सेटअप यासारखे खास फीचर्स आहेत.

वाचाः

Honor 10X Lite ची किंमत
ऑनर १० एक्स लाइटची किंमत १५ हजार ९०० रुपये आहे. फोन आइसलँडिक फ्रॉस्ट, मिडनाइट ब्लॅक आणि एमरेल्ड ग्रीन कलरमध्ये येतो.

वाचाः

Honor 10X Lite चे फीचर्स
ऑनर १० एक्स लाइटमध्ये ६.६७ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले आहे. याचा रिझॉल्यूशन 1080 x 2400 पिक्सल आहे. फोनच्या पुढच्या बाजुला फ्रंट कॅमेरा होल पंच कटआउट दिला आहे. स्मार्टफोनचा डिस्प्ले स्लीम सोबत येतो. स्क्रीन टू बॉडी रेशियो ९०.३ टक्के आहे. हँडसेटमध्ये ४ जीबी रॅम प्लस १२८ जीबी इनबिल्ट स्टोरेज दिला आहे. स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने ५१२ जीबी पर्यंत वाढवता येवू शकतो.

वाचाः

ऑनर १० एक्स लाइटमध्ये ऑक्टा कोर किरीन प्रोसेसर दिला आहे. कंपनीने प्रोडक्ट पेजवर प्रोसेसरचे नाव नाही. परंतु, ऑनरच्या या फोनमध्ये किरीन हायसिलिकॉन ७१० चिपसेट दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी या फोनमध्ये 5000mAh बॅटरी दिली आहे. २२.५ वॉट फास्ट चार्जिंग आणि रिव्हर्स चार्जिंग सपोर्ट करतो. हा फोन ३० मिनिटात ४६ टक्क्यांपर्यंत चार्ज होत असल्याचा कंपनीचा दावा आहे. फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल, २ मेगापिक्सलचा डेप्थ आणि २ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स दिला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा होल पंच कॅमेरा दिला आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here