नवी दिल्लीः स्मार्टफोन मेकर कंपनी मोटोरोला लवकरच स्मार्टफोन घेवून येण्याची तयारी करीत आहे. ९१ मोबाइल्सच्या रिपोर्टनुसार, हा फोन यूएस फेडरल कम्यूनिकेशन कमिशन (FCC), नेशनल ब्रॉडकास्टिंग आणि टेलिकम्यूनिकेशन कमिशन (NBTC) आणि TUV सर्टिफिकेशन वेबसाइट वर पाहिले गेले आहे.

वाचाः

4,000mAh बॅटरी मिळणार
टीयू्ही सर्टिफिकेशन वरून माहिती होत आहे की, 4,000mAh ची बॅटरी दिली जाणार आहे. जी ५ वॉट चार्जिंग स्पीड सपोर्ट करणार आहे. तर NBTC सर्टिफिकेशन वरून माहिती होत आहे की, बॉक्स मध्ये AC अडेप्टर, बॅटरी, इयरफोन आणि यूएसबी केबल मिळणार आहे. कंपनीने Moto E7 Plus स्मार्टफोन भारतात नुकताच लाँच केलेला आहे. याची किंमत ९ हजार ४९९ रुपये ठेवण्यात आली होती. त्यामुळे हा फोन यापेक्षा स्वस्त असणार आहे.

वाचाः

Moto E7 चे फीचर्स (संभावित)
या फोनमध्ये ६.२ इंचाचा डिस्प्ले दिला जाण्याची शक्यता आहे. एचडी प्लस रिझॉल्यूशन (720×1,520 पिक्सल्स) असेल. फ्रंट कॅमेऱ्यासोबत डिस्प्ले नॉच असणार आहे. फोनमध्ये २ जीबी रॅम प्लस ३२ जीबी इंटरनल स्टोरेज मिळू शकतो. फोटोग्राफीसाठी स्मार्टफोनमध्ये ड्यूल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. ज्यात १३ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर दिला जाणार आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये ५ मेगापिक्सलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला जाण्याची शक्यता आहे. स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर मिळू शकणार आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here