नवी दिल्लीः टेलिकॉम कंपन्यांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नव-नवीन प्लान्स व ऑफर आणल्या आहेत. एअरटेलने आपल्या ग्राहकांसाठी १७९ रुपयांचा एक नवा आणला आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना फ्री एसएमएस, डेटा आणि कॉलिंगसह एएक्सएचा लाइफ इन्शुरन्स दिला जात आहे. १७९ रुपयांचा रिचार्ज केल्यानंतर ग्राहकांना २ लाखांचा विमा कवच मिळणार आहे.

एअरटेलने याआधी काही प्लान्स आणले होते. यात ग्राहकांना ४ लाख रुपयांपर्यंत इंश्यरेंस ऑफर दिली होती. एअरटेलचा १७९ रुपयांचा हा प्लान आजपासून (१९ जानेवारी) सुरू झाला आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना Bharti AXA कडून २ लाख रुपयांचा लाइफ इन्शुरन्स मिळणार आहे. २८ दिवसांची वैधता असलेल्या या प्लानमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड फ्री कॉलिंग करण्यात येऊ शकते. प्लानमध्ये ग्राहकांना ३०० फ्री एसएमएस दिले जाणार आहे. प्लानमध्ये ग्राहकांना एक्सट्रीम अॅप आणि विंक म्युझिकचे फ्री सब्सक्रिप्शन दिला जाणार आहे. एअरटेलचा २ लाखांचा लाइफ इन्शुरन्स १८ वर्षे ते ५४ वर्षे या व्यक्तींना मिळणार आहे. यासाठी कोणत्याही मेडिकल पेपरवर्कची गरज नाही.

एअरटेलचा १७९ रुपयांचा रिचार्ज केल्यानंतर लगेच इन्शुरन्स पॉलिसी फॉर्म मिळणार आहे. जर ग्राहकांना फिजिकली कॉपी हवी असल्यास ग्राहकांना विनंती केल्यानंतर ती मिळून जाईल. २७९ रुपयांच्या प्रीपेड प्लानवर ग्राहकांना ४ लाखांचा विमा मिळत आहे. २८ दिवसांच्या वैधतेसह ग्राहकांना दररोज १.५ जीबी डेटा आणि १०० एसएमएस मिळणार आहे. तसेच या प्लानमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड फ्री कॉलिंग दिली जात आहे.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here