नवी दिल्लीः गेल्या दोन महिन्यात सप्टेंबर आणि ऑक्टोबर मध्ये खूप साऱ्या स्मार्टफोन कंपन्यांनी डझनहून अधिक स्मार्टफोन लाँच केले आहेत. याशिवाय फेस्टिव सेल दरम्यान याची बंपर सेल केली आहे. जर तुम्हाला नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर थोडावेळ वाट पाहा. नोव्हेंबर महिन्यात शाओमीपासून विवो आणि इंडियन स्मार्टफोन ब्रँड मायक्रोमॅक्स सुद्धा आपले नवीन स्मार्टफोन्स घेवून येत आहे. नोव्हेंबर महिन्यात लाँच करण्यात करण्यात येत असलेल्या स्मार्टफोनसंबंधी जाणून घ्या.

वाचाः

चायनीज स्मार्टफोन मेकर विवो कडून ६.४४ इंचाचा अमोलेड डिस्प्ले आणि क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ७६५ जीबीचा प्रोसेसरचा Vivo V20 Pro लाँच केला जावू शकतो. यात ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज शिवाय, ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सरचा ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळू शकतो. ड्यूल सेल्फी कॅमेरा असलेल्या या फोनमध्ये 4000mAh बॅटरी फास्ट चार्जिंग सोबत येते.

वाचाः

शाओमीकडून या महिन्यात स्नॅपड्रॅगन 765G प्रोसेसरचा Redmi Note 10 Pro लांच केला जावू शकतो. ६.७ इंचाचा IPS LCD डिस्प्लेचा या फोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा क्वॉड कॅमेरा आणि ६ जीबी रॅम दिला जावू शकतो. फोनला पॉवर देण्यासाठी यात 5,100mAh ची बॅटरी फास्ट चार्जिंग सपोर्ट सोबत येते. फोनमध्ये ६४ जीबी इंटरनल स्टोरेज मिळू शकतो.

वाचाः

Realme C17
रियलमी बजेट सेगमेंटमध्ये प्रसिद्ध आपली सी सीरीज अंतर्गत Realme C17 समावेश केला जावू शकतो. या फोनमध्ये ६.५ इंचाचा एचडी प्लस एलसीडी, स्नॅपड्रॅगन ४६० चिपसेट, ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज शिवाय क्वॉड कॅमेरा सेटअप मिळू शकतो. यात ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आणि १८ वॉट फास्ट चार्जिंस सह 5000mAh बॅटरी मिळू शकते.

वाचाः

Micromax In सीरीज
अडीच वर्षानंतर मायक्रोमॅक्स कमबॅक करण्यासाठी तयार आहे. नवीन स्मार्टफोन सीरीज ३ नोव्हेंबर रोजी येत आहे. यात दोन फोन Micromax In 1 आणि In 1a असू शकते. Micromax In 1 मध्ये मीडियाटेक Helio G85 आणि In 1a मध्ये मीडियाटेक Helio G35 प्रोसेसर दिला जावू शकते. दोन्ही फोनची किंमत १५ हजार रुपयांपेक्षा कमी असू शकते. लीक्सच्या माहितीनुसार, Micromax In 1a मध्ये ६.५ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले, 5000mAh बॅटरी तसेच १६ मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा मिळू शकतो. यात ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला जावू शकतो.

वाचाः

टेक ब्रँड Vivo V20 Pro सोबत याचा स्वस्त व्हर्जन Vivo V20 SE आणले जावू शकते. या फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा स्नॅपड्रॅगन प्रायमरी सेन्सरचा ट्रिपल कॅमेरा सेटअप, ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा, क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ६६५ प्रोसेसर, ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज मिळू शकतो. याशिवाय, ६.४४ इंचाचा अमोलेड डिस्प्ले फोनमध्ये पॉवर देण्यासाठी 4100mAh बॅटरी, ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट सोबत येते.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here