जयंत चौगुले

तुमच्याकडील अँडड्राइड , टॅब्लेट आणि लॅपटॉप या उपकरणांमध्ये काही समस्या नाहीत ना हे वेळोवेळी बघितलं पाहिजे. यासाठी अॅप्सची मदत होऊ शकते. या अॅप्समध्ये मल्टीटच, टच स्क्रीन, इअरफोन व मायक्रोफोन, स्पीकर व मायक्रोफोन, कॉल फंक्शन, क्सिलरोमीटर, जायरोस्कोप, प्रॉक्सिमिटी सेन्सर, डिस्प्ले, कम्पास, स्टोरेज, मेमरी, स्पेस चेक, सीपीयू, कॅमेरा, व्हायब्रेशन, फ्लॅश, इअरफोन जॅक, जीपीएस, थ्रीजी चिप, वायफाय, ब्लूटूथ, सायलेंट व व्हॉल्यूम कंट्रोल बटण, होम बटण, स्लीप बटण, टेम्परेचर सेन्सर, आर्द्रता सेन्सर, प्रेशर सेन्सर, स्टेप काऊंटर आणि लाइट सेन्सर अशा विविध चाचण्यांचा समावेश असतो. यामुळे तुमच्या उपकरणात नेमका काय बिघाड झाला आहे, हे कळतं. अशाच काही अॅप्सविषयी…

वाचाः

स्मार्टफोनसाठी अॅप्स

फोन डॉक्टर प्लस

‘फोन डॉक्टर प्लस’ हे अ‍ॅप यादीतील सर्वोत्कृष्ट अ‍ॅप्सपैकी एक आहे. स्मार्टफोनमध्ये काय सुरु आहे, काही बिघाड झाला आहे किंवा काय काळजी घेणं अपेक्षित आहे हे सोप्या पद्धतीनं सांगितलं जातं. फोन डॉक्टर प्लस वापरणं सोपं आहे. शिवाय, अॅप स्मार्टफोनमधील प्रत्येक घटकाची चाचणी केली जाते. त्यानुसार निष्कर्ष काढले जातात. फोन डॉक्टर प्लसमध्ये ३० वेगवेगळ्या प्रकारच्या चाचण्यांचा समावेश आहे. मल्टीटच, टच स्क्रीन, इअरफोन आणि मायक्रोफोन, स्पीकर आणि मायक्रोफोन, कॉल फंक्शन, क्सिलरोमीटर, जायरोस्कोप, प्रॉक्सिमिटी सेन्सर, डिस्प्ले, कम्पास, स्टोरेज, मेमरी, स्पेस चेक, सीपीयू, कॅमेरा, व्हायब्रेशन, फ्लॅश, इअरफोन जॅक, जीपीएस, थ्रीजी चिप, वायफाय, ब्लूटूथ, सायलेंट आणि व्हॉल्यूम कंट्रोल बटण, होम बटण, स्लीप बटण, टेम्परेचर सेन्सर, आर्द्रता सेन्सर, प्रेशर सेन्सर, स्टेप काऊंटर आणि लाइट सेन्सर आहे. म्हणजेच तुमचा स्मार्टफोन सुस्थित आहे की नाही यावर लक्ष ठेवलं जातं. फोन डॉक्टर प्लस हे अॅप वापरण्यास प्राधान्य दिलं जातं. हे अॅप मोफत आहे.

वाचाः

टेस्ट युअर अँड्रॉइड

टेस्ट युअर अँड्रॉइड हे अॅप अँड्रॉइड स्मार्टफोन किंवा टॅब्लेटविषयीचे तपशील देतं. या अॅप अंतर्गत अनेक चाचण्या वेळोवेळी केल्या जातात. यामुळे अधिक चांगल्या प्रकारे समस्यांचा निदान करता येतं. वापरण्यास सुलभ असलेल्या इंटरफेसने चाचणी करुन घ्या. टचस्क्रीन, मल्टीटच, कॅमेरा, फिंगरप्रिंट, फ्लॅशलाइट, साऊंड अँड व्हायब्रेशन, मायक्रोफोन, एनएफसी, लोकेशन, स्टेप्स सेन्सर, तापमान, कम्पास, लाइट सेन्सर, प्रॉक्सिमिटी सेन्सर, प्रेशर सेन्सर आणि ग्रॅव्हीटी सेन्सर. याव्यतिरिक्त, एक सिस्टम मॉनिटर विभाग देखील आहे. या अॅपमध्ये प्रोसेसर, नेटवर्क आणि मेमरी यावरही लक्ष ठेवलं जातं. हे अॅप प्ले स्टोअरवर मोफत आहे. तसंच या अॅपमध्ये भरपूर प्रमाणात जाहिराती येतात.

वाचाः

फोन चेक अँड टेस्ट

वेगळा दृष्टिकोन समोर ठेवून फोन चेक अँड टेस्ट हे अॅप बनवण्यात आलं आहे. फोनची तपासणी करण्यासाठी कोणत्या चाचण्या करायच्या किंवा नाही करायच्या हे निवडण्याची मुभा असते. यामध्ये डिव्हाइसची माहिती, बॅटरी व चार्जिंग सॉकेट चाचणी, टेलिफोन व वायफाय, नेटवर्क गेटवे पिंग, मायक्रोफोन, स्पीकर, हेडफोन जॅक, व्हॉल्यूम बटणं, व्हायब्रेशन, टचस्क्रीन, नेटवर्क आणि जीपीएस लोकेशन, कॅमेरा आणि फ्लॅश, सेन्सर तपासणी, सीपीयू, मेमरी, स्टोरेज, बॅटरी वापर आणि तापमानाचा अहवाल देणं इ. गोष्टींचा समावेश असतो. सर्व चाचण्या करुन झाल्या की व्यवस्थित अहवाल सादर केला जातो. तसंच उपकरणामध्ये काही समस्या असल्यास तेदेखील सूचित केलं जातं. फोन चेक अँड टेस्ट अ‍ॅप मोफत आहे. या अॅपची एक प्रो आवृत्तीदेखील आहे, जी जाहिराती काढून टाकते आणि ब्लूटूथ, एनएफसी फिंगरप्रिंट सेन्सरसाठी काही चाचण्या जोडते.

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here