नवी दिल्लीः सर्च इंजिन कंपनी गुगलकडून अधिकृत प्ले स्टोरवर जे अॅप्स सिक्योर आहेत तेच ऑफर केले जातात. परंतु, अनेकदा धोकादायक अॅप्स प्ले स्टोरपर्यंत पोहोचतो. जे युजर्संना नुकसान पोहोचू शकते. अशा १७ अॅप्सला गुगल प्ले स्टोरवरून हटवले आहे. या अॅप्समध्ये धोकादायक मेलवेयर असल्याची माहिती मिळाल्यानंतर तुमच्या फोनमध्ये असल्यास तात्काळ डिलीट करा.

वाचाः

रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, Zscaler च्या एका सिक्यॉरिटी रिसर्चर ने याची माहिती उघड केली आहे. प्ले स्टोरवर उपलब्ध असलेल्या १७ अॅप्लिकेशनमध्ये Joker (Bread) मेलवेयर उपलब्ध आहे. कोणत्याही धोकादायक अॅपची माहिती गुगलला होताच गुगल आपल्या प्लॅटफॉर्मवरून हटवते. पुन्हा एकदा सर्च इंजिन कंपनीने हेच केले आहे. या अॅप्सला डिलीट केले असून प्ले प्रोटेक्ट डिसेबल सर्विस सुरू केली आहे. ज्यांच्या फोनमध्ये हे अॅप्स इंस्टॉर आहेत. त्यांनी तात्काळ डिलीट करायला हवे.

वाचाः

पर्सनल डेटा चोरी करतो
Zscaler च्या सिक्यॉरिटी रिसर्चर वायरल गांधी यांनी सांगितले की, या स्पायवेयरला युजर्सच्या एसएमएस, कॉन्टॅक्ट आणि फोनमधील माहिती चोरण्यासाठी डिझाईन केले आहे. तसेच युजर्संना हे अनेक प्रीमियम वायरलेस अॅप्लिकेशन प्रोटोकॉल (WAP) सर्विसेज साठी साइन अप करते. हे तिसरे प्रकरण आहे. ज्यात गुगल सिक्योरिटी टीमला चकवा देवून जोकरचे अॅप्स प्ले स्टोरपर्यंत पोहोचल्याचे समोर आले आहे.

वाचाः

तात्काळ करा डिलीट
गेल्या महिन्यात गुगलने असे ६ अॅप्सला गुगल प्ले स्टोरवरून हटवले होते. वर्षाच्या सुरुवातीला गुगलने एक ब्लॉग पोस्ट मध्ये सांगितले होते की, जोकर सध्या सर्वात धोकादायक मेलवेयर आहे. मार्च पासून अॅक्टिव असलेल्या या अॅप्सला लाखो अँड्रॉयड युजर्संना लक्ष्य केलेले आहे.

वाचाः

या अॅप्सची यादी पाहा, तसेच तात्काळ डिलीट करा

– All Good PDF Scanner
– Mint Leaf Message-Your Private Message
– Unique Keyboard – Fancy Fonts and Free Emoticons
– Tangram App Lock
– Direct Messenger
– Private SMS
– One Sentence Translator – Multifunctional Translator
– Style Photo Collage
– Meticulous Scanner
– Desire Translate
– Talent Photo Editor – Blur focus
– Care Message
– Part Message
– Paper Doc Scanner
– Blue Scanner
– Hummingbird PDF Converter – Photo to PDF
– All Good PDF Scanner

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here