नवी दिल्लीः रियलमी भारतात लवकरच आपली एक्स ७ सीरीज लाँच करणार आहे. एक टिप्स्टरने दावा केला आहे की, रियलमी डिसेंबर मध्ये ५जी मॉडल सोबत आणि भारतात या वर्षी डिसेंबर मध्ये लाँच करणार आहे. या स्मार्टफोनला या आधी भारतातील BIS सर्टिफिकेशन वेबसाइटवर लिस्ट करण्यात आले होते. आता टिप्स्टर मुकुल शर्माने लाँच संबंधी अधिक माहिती शेयर केली आहे.

वाचाः

रियलमी एक्स7 प्रो 5जी ला ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) वर पाहिले गेले आहे. याची माहिती टिप्स्टर सुधांशू यांनी सार्वजनिक केली होती. सुधांशू ने ट्विट करून सांगितले की, रियलमी प्रोडक्टचे मॉडल नंबर RMX2121 आहे.

वाचाः

स्मार्टफोनच्या मॉडल नंबर पाहिल्यास चीनमध्ये लाँच वेळी हेच मॉडल पाहिले गेले होते. याआधी रियलमी एक्स ७ प्रो ५जी ला थायलंडच्या आणि तायवान च्या सर्टिफिकेशन वेबसाइट्स वर लिस्ट करण्यात आले होते. याचाच अर्थ डिव्हाईसला ग्लोबली लाँच करण्यात येणार आहे. NBTC लिस्टिंग च्या माहितीनुसार हँडसेटचे मॉडल नंबर ची माहिती उघड झाली आहे. तर NCC सर्टिफिकेशन वरून रियलमी फोन च्या स्पेस संबंधी माहिती मिळाली होती. याशिवाय रियलमी मोबाइल्सचे सीईओ माधव सेठ यांनी भारतात रियलमी एक्स ७ सीरीजला लाँच करण्यासंबंधी माहिती शेयर केली होती.

वाचाः

चीनमध्ये रियलमी एक्स ७ प्रो ५ जी ब्लॅक, ग्रेडियंट आणि फँटिसी व्हाइट कलर मध्ये येते. याची किंमत २१९९ चिनी युआन म्हणजेच २३ हजार रुपये आहे. चीनमध्ये लाँच करण्यात आलेल्या रियलमी एक्स ७ प्रो ५जी मध्ये ६.५५ इंचाचा अमोलेड डिस्प्ले मिळणार आहे. या फोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी १००० प्लस चिपसेट आणि ३२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये रियरवर क्वॉड कॅमेरा सेटअप दिला आहे. जो ६४ मेगापिक्सल, ८ मेगापिक्सलचा आणि २ मेगापिक्सलचे २ कॅमेरे लेन्स दिले आहेत.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here