नवी दिल्लीः बीएसएनएलने नुकतेच आपल्या पाच प्रीपेड STVs बंद केले होते. परंतु आता पुन्हा एकदा बीएसएनएलने STV 395 संबंधी रिविजन सोबत बातमी आली आहे. या रिविजन सोबत बीएसएनएलने व्हाइस कॉलिंग लिमिट पुन्हा एकदा सुरू केली आहे. टेलिकॉम कंपनी ३१ ऑक्टोबर पर्यंत अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग बेनिफिट ऑफर करीत होती. STV 395 मध्ये रोज २ जीबी डेटा मिळतो. याची वैधता ७१ दिवसाची आहे. लेटेस्ट रिविजन नंतर हे सर्व फायदे मिळत राहतील.

वाचाः

BSNL STV 395 मध्ये नवीन बदल झाल्यानंतर ३ हजार ऑन नेट तर १८०० ऑफ नेट मिनिट्स फ्री ऑफर केले जात आहे. याआधी या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हाइस कॉलिंगचा फायदा मिळत होता. परंतु, टेलिकॉम कंपनीने रोज २५० मिनिटची कॅपिंग ठेवली होती. फ्री मिनिट्स नंतर युजर्संना २० पैसे प्रति मिनिट याप्रमाणे चार्ज द्यावा लागणार आहे.

वाचाः

वोडाफोन आयडिया आणि एअरटेल यासारख्या खासगी कंपन्या विना कोणत्याही एफयूपी लिमिटच्या अनलिमिटेड व्हाईस कॉलिंग ऑफर करीत आहे. रिलायन्स जिओने ऑफ नेटवर्क कॉलिंग मिनिट्ससाठी कॅपिंगकडून ६ पैसे प्रति मिनिट चार्ज आकारते.

वाचाः

बीएसएनएलच्या एसटीव्ही ३९५ सोबत रोज २ जीबी डेटा ७१ दिवसांसाठी मिळतो. नवीन एसटीव्ही ३९५ मुंबई आणि दिल्ली सर्कल शिवाय सर्व टेलिकॉम सर्करमध्ये उपलब्ध आहे. या दोन्ही महानगरात BSNL च्या जागी MTNL आपली सर्विस प्रोव्हाइड करीत आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here