नवी दिल्लीः चीनची कंपनी शाओमीने भारतात बनवलेल्या मी पॉवर बँकच्या विक्रीत रेकॉर्ड बनवला आहे. आतापर्यंत भारतात मेड इन इंडिया च्या १० मिलियनहून जास्त युनिटची विक्री झाली आहे. या आठवड्यात शाओमी भारतात कॉम्पॅक्ट साइज पॉवर बँक लाँच करणार आहे. याची फार उत्सूकता लागली आहे. याआधी शाओमी एमआय ब्रँड ३ आणि रेडमी ब्रँड २ पॉवर बँक भारतात लाँच केलेले आहे. याची सुद्धा बंपर विक्री होत आहे.

वाचाः

या सेगमेंटचा होणार विस्तार
या फेस्टिवल सीजन शाओमीने स्मार्टफोन्ससोबत पॉवर बँकेच्या विक्रीत रेकॉर्ड बनवला आहे. शाओमीने २०१७ मध्ये Mi Power Bank 2i चे दोन मॉडल 10,000mAh आणि 20,000mAh चे प्रोडक्शन सुरू केले होते. भारतात या डिव्हाईसेजची असेंबिलिंग होते. कंपनीने गेल्या ३ वर्षात एक कोटींहून जास्त पॉवर बँक्सची विक्री केली आहे. तसेच या सेगमेंटमध्ये आणखी विस्तार करण्याचे कंपनीने ठरवले आहे.

वाचाः

शाओमीच्या या पॉवर बँकचा जलवा
भारतात शाओमीचा पॉवर बँक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. याची नावे पुढीलप्रमाणे आहेत. Redmi Power Bank 20,000mAh, Redmi Power Bank 10,000mAh, Mi Power Bank 3i 10,000mAh, Mi Power Bank 3i 20,000mAh आणि Mi Wireless Power Bank 10,000mAh। कंपनी आता यात Mi Power Bank 3 Pocket Edition सहभागी करीत आहे. फास्ट चार्जिंग सपोर्ट सोबत येते. ५ नोव्हेंबर रोजी लाँच करण्यात येणार आहे.

वाचाः

मेड इन इंडिया प्रोडक्ट्सवर जोर
काही महिन्यापूर्वी भारत-चीन सीमा वादाने या दोन्ही देशात तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे चायनीज प्रोडक्टवर बहिष्कार मोहिम जोरात सुरू करण्यात आली होती. त्यामुळे शाओमी, विवो, ओप्पो, रियलमी, वनप्लस, टेक्नो, इनफिनिक्स, हुवावे आणि ऑनर सह अनेक कंपन्यांनी आता मेड इन इंडिया प्रोडक्ट्सवर फोकस केला आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here