नवी दिल्लीः विवोचा प्रसिद्ध स्मार्टफोन ५०० रुपयांनी स्वस्त झाला आहे. किंमतीत कपात करण्यात आल्यानंतर ३ जीबी रॅम प्लस ३२ जीबी इंटरनल स्टोरेजच्या व्हेरियंटची किंमत ८ हजार ४९० रुपये झाली आहे. फोनची नवी किंमत कंपनीच्या वेबसाइट सोबत अॅमेझॉनवर सुद्धा अपडेट केली आहे. विवोचा हा बजेट स्मार्टफोन या वर्षी लाँच करण्यात आला होता. विवोच्या या फोनच्या किंमतीत कपात करण्यात आल्याची माहिती महेश टेलिकॉमने आपल्या ट्विटर हँडलवरून दिली आहे.

वाचाः

Vivo Y91i चे खास वैशिष्ट्ये
फोनमध्ये 720×1520 पिक्सल रेजॉलूशन सोबत ६.२२ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. या फोनमध्ये मीडियाटेक हीलियो पी २२ प्रोसेसर दिला आहे. फोनमध्ये अँड्रॉयड ८.१ वर बेस्ड Funtouch OS 4.5 सोबत दिला आहे.

वाचाः

३२ जीबी इंटरनल मेमरीच्या फोनचे स्टोरेजला मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने वाढवता येवू शकते. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये एलईडी फ्लॅश सोबत १३ मेगापिक्सलचा सिंगल रियर कॅमेरा मिळणार आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये ५ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे.

वाचाः

फोनला पॉवर देण्यासाठी यात 4,030mAh बॅटरी दिली आहे. या फोनमध्ये कनेक्टिविटीसाठी 4G LTE, वाय-फाय, ब्लूटूथ 5.0, जीपीएस/ए-जीपीएस, एफएम रेडियो, मायक्रो यूएसबी आणि 3.5mm हेडफोन जॅक यासारखे फीचर्स दिले आहेत.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here