नवी दिल्लीः BSNLने पोस्टपेड प्लान्समध्ये जोरदार टक्कर देण्यासाठी तयारी केली आहे. कंपनी १ डिसेंबर रोजी तीन नवीन पोस्टपेड प्लान्स लाँच करणार आहे. याची किंमत १९९ रुपये, ७९८ रुपये आणि ९९९ रुपये आहे. या तिन्ही प्लान्सची थेट टक्कर जिओ फायबर पोस्टपेड सोबत होणार आहे. टेलिकॉमटॉकच्या रिपोर्टनुसार, नवीन प्लान्स आल्यानंतर कंपनी ९९ रुपये, २२५ रुपये आणि ३२५ रुपये, ७९९ रुपये आणि ११२५ रुपयांचे जुने प्लान बंद करणार आहे.

वाचाः

BSNLचा १९९ रुपयांचा पोस्टपेड प्लान
कंपनीचा हा सर्वात सुरुवातीचा प्लान असणार आहे. यात ग्राहकांना २५ जीबी डेटा आणि ७५ जीबी डेटा पर्यंत रोलओवरची सुविधा मिळणार आहे. बीएसएनएल नेटवर्कवर कॉलिंग अनलिमिटेड राहणार आहे. तर अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी ३०० मिनिट्स दिले जाणार आहे. तसेच १०० एसएमएसची सुविधा दिली जाणार आहे.

वाचाः

BSNLचा ७९८ रुपयांचा पोस्टपेड प्लान
७९८ रुपयांच्या प्लानध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि ५० जीबी डेटा दर महिन्याला मिळणार आहे. कंपनी या प्लानमध्ये १५० जीबी पर्यंत डेटा रोलओवर सुविधा आणि १०० एसएमएस प्रति दिन देणार आहे. या प्लानचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात अॅड ऑन कनेक्शनची सुविधा दिली जाणार आहे. यात प्रायमरी कनेक्शनप्रमाणे अनलिमिटेड कॉलिंग, ५० जीबी डेटा आणि १०० एसएमएस मिळणार आहे.

वाचाः

BSNLचा ९९९ रुपयांचा पोस्टपेड प्लान
हा कंपनीचा सर्वात महागडा प्लान आहे. यात ग्राहकांना ७५ जीबी डेटा आणि २२५ जीबी पर्यंत डेटा रोलओवर सुविधा मिळणार आहे. ग्राहक सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १०० एसएमएसची सुविधा मिळणार आहे. तसेच यात ३ फॅमिली अॅड ऑन कनेक्शनची सुविधा दिली जाणार आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here