नवी दिल्लीः लेनोवाने स्मार्टफोनची रेंज वाढवत आपला नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. हा फोन भारतात लाँच करण्यात आलेल्या Moto G9 चा रिब्रँडेड व्हर्जन आहे. या फोनमध्ये जबरदस्त आस्पेक्ट रेशियो, ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आणि मोठी बॅटरी यासारखे खास फीचर्स दिले आहेत.

वाचाः

कंपनीने मोटो जी ९ च्या या रिब्रँडेड लेनोवा स्मार्टफओनला सौदी अरबमध्ये लाँच केले आहे. सफायर ब्लू आणि फॉरेस्ट ग्रीन कलर ऑप्शनमध्ये येणाऱ्या या फोनची किंमत १६० डॉलर म्हणजेच ११ हजार ८०० रुपये ठेवण्यात आली आहे.

वाचाः

Lenovo K12 Note चे खास फीचर्स
फोनमध्ये 720×1600 पिक्सल रेजॉलूशन सोबत ६.५ इंचाचा एचडी प्लस IPS LCD डिस्प्ले दिला आहे. अँड्रॉयड १० ओएस वर काम करणाऱ्या या डिव्हाईसमध्ये रियर फिंगरपिंट सेन्सर आणि गुगल असिस्टेंट अॅक्सेस करण्यासाठी डेडिकेटेड बटन दिले आहे. ४ जीबी रॅम प्लस १२८ जीबी इंटरनल स्टोरेजच्या या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ६६२ प्रोसेसर दिला आहे.

वाचाः

फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये तीन कॅमेरे दिले आहे. जे कॅमेरा मॉड्यूलच्या आतमध्ये लावलेले आहेत. यात एलईडी फ्लॅश सोबत एक ४८ मेगापिक्सलचा मेन कॅमेरा, २ मेगापिक्सलचा मायक्रो शूटर आणि एक २ मेगापिक्सलचा डेप्थ असिस्ट लेन्स दिले आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी या फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे.

वाचाः

फोनला पॉवर देण्यासाठी यात 5000mAh बॅटरी दिली आहे. १५ वॉटची फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. कनेक्टिविटीसाठी या फोनमध्ये ड्यूल सिम सपोर्ट, 4G VoLTE, वाय-फाय 802.11ac, ब्लूटूथ 5.0, जीपीएस, यूएसबी-C आणि 3.5mm हेडफोन जॅक दिला आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here