नवी दिल्लीः प्रसिद्ध मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर गेल्या काही दिवसांपासून आपली पेमेंट सर्विस ची टेस्टिंग केली जात होती. २०१८ मध्ये बीटा युजर्ससोबत सुरू झालेली ही टेस्टिंग नंतर आता हे फीचर सर्व युजर्ससाठी उपलब्ध करण्यात आले आहे. याच्या मदतीने युजर्स चॅटिंग करताना या प्लॅटफॉर्मवर पेमेंट सुद्धा करू शकणार आहेत.

वाचाः

व्हॉट्सअॅपला पेमेंट सर्विस भारतात सुरू करण्यासाठी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) कडून हिरवा कंदील मिळाला आहे. परवानगी मिळाली असली तरी एक मर्यादा लावण्यात आली आहे. Pay च्या फर्स्ट सेगमेंट मध्ये NPCI ने २ कोटी युजर्सला एक कॅप सेट केले आहे. म्हणजेच युजर्सला आता व्हॉट्सअॅपचे पेमेंट फीचर युज करण्याचा ऑप्शन मिळणार आहे.

वाचाः

यूपीआयच्या मदतीने होणार पेमेंट
भारतात व्हॉट्सअॅपचे युजरबेस जवळपास ४० कोटी युजर्सचा आहे. फेसबुक सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी म्हटले, आम्ही नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया सोबत काम करीत होतो. त्यामुळे प्रत्येक पेमेंटचे सिक्योर आणि विश्वास असणे गरजेचे आहे. आम्ही भारताच्या युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसच्याद्वारे असे करू शकलो आहे. याच्या मदतीने हे सोप्या पद्धतीने वेगवेगळ्या अॅप्सवर सर्विस देणाऱ्या कंपन्यासाठी पेमेंट करू शकतील.

वाचाः

१० स्थानिक भाषेचा सपोर्ट
Whatsapp Pay भारतातील १० स्थानिक भाषेत उपलब्ध करण्यात आले आहे. अॅपचे लेटेस्ट व्हर्जनवर iOS आणि Android यूजर्स याचा वापर करु शकतील. यासाठी युजर्ससाठी कोणत्याही यूपीआय सपोर्टेड बँकेचे डेबिट कार्ड असणे गरजेचे आहे. व्हॉट्सअॅपने आपल्या पेमेंट सिस्टमची टेस्टिंग फेब्रुवारी २०१८ मध्ये सुरू केली होती.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here