नवी दिल्लीः टेलिकॉम कंपनी BSNLने या आठवड्यात १९९ रुपयांचा आपला एन्ट्री लेवल पोस्टपेड प्लान लाँच केला होता. नवीन १९९ रुपयांच्या बीएसएनएल प्लानमध्ये आधीच्या रिलायन्स जिओच्या १९९ रुपयांच्या प्लानला टक्कर मिळणार आहे. जिओने नुकतेच जिओ पोस्टपेड प्लस प्लान सोबत १९९ रुपयांचा प्लान आणला होता. दोन्ही कंपन्या १९९ रुपयांत अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग, २५ जीबी डेटा दर महिन्याला, रोज 100SMS यासारखे बेनिफिट्स देत आहे. परंतु, या दोन्ही मध्ये काही मोठा फरक सुद्धा आहे.

वाचाः

BSNL vs Reliance Jio: १९९ रुपयांचा रिचार्जमधील फरक
१९९ रुपयांच्या पोस्टपेड प्लान मध्ये जिओ नेटवर्कवर अनलिमिटेड व्हाइस कॉलिंगची सुविधा मिळते. तर अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी ६ पैसे प्रति मिनिट चार्ज केला जातो. याशिवाय, २५ जीबी ४जी डेटा मिळतो. या प्लानमध्ये डेटासाठी कोणतीही कॅपिंग आणि डेटा रोलओवर फॅसिलिटी नाही. जर युजर २५ जीबी डेटा संपल्यानंतर त्यांना ५०० जीबी पर्यंत डेटा २० पैसे प्रति जीबी या हिशोबाप्रमाणे वापरता येतो. तसेच युजर्संना जिओ अॅप्सचे फ्री अॅक्सेस आणि १०० एसएमएस दर महिन्याला मिळते.

वाचाः

बीएसएनएलच्या १९९ रुपयांच्या पोस्टपेड प्लानमध्ये नेटवर्कवर अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग मिळते. तसेच रोज १०० एसएमएस आणि ७५ जीबी रोलओवर डेटा सोबत २५ जीबी डेटा ऑफर केला जातो. जिओ पेक्षा वेगळा असलेल्या या प्लानमध्ये ३०० मिनिट अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी दिले जातात. दोन्ही प्लानमध्ये मिळणारे फायदे एकसारखेच आहेत. परंतु, बीएसएनएलच्या प्लानमध्ये दुसऱ्या नेटवर्कवर कॉलिंग मिनिट्स आणि डेटा रोलओवर फॅसिलिटी सारखे फायदे सुद्धा मिळतात.

वाचाः

बीएसएनएलचा ७९८ रुपये आणि ९९९ रुपयांचा प्लान सुद्धा पुढील महिन्यात लाँच केला जावू शकतो. या प्लानमध्ये फॅमिली अॅड-ऑन डेटा रोलओवर सारखी सुविधा आहे. जवळपास तीन वर्षानंतर आता बीएसएनएल पोस्टपेड सेगमेंटमध्ये टक्कर देण्यासाठी तयार आहे. परंतु, ४जी सर्विस नसल्याने टेलिकॉम कंपन्यांना नुकसान होईल. बीएसएनएलच्या ७९८ रुपये आणि ९९९ रुपयांचे पोस्टपेड प्लानमध्ये ओटीटी सब्सक्रिप्शन ऑफर केले जावू शकते. तसेच ५२५ रुपयांचा प्लानला सुद्धा फॅमिली अॅड ऑन बेनिफिट सोबत रिवाइज केले जावू शकते.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here