नवी दिल्लीः सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड बीएसएनएलने १ डिसेंबर पासून आपल्याकाही नवीन प्लान आणण्याची तयारी केली आहे. तसेच जुन्या प्लान्समध्ये बदल करण्याचे ठरवले आहे. कंपनी तीन नवीन पोस्टपेड प्लान्स आणणार आहे. याची किंमत १९९ रुपये, ७९८ रुपये आणि ९९९ रुपये असणार आहे. तसेच बीएसएनएल आपले १०६ रुपये आणि १०७ रुपयांचे प्रीपेड प्लान्स बदलणार आहे. केरळ टेलिकॉमच्या रिपोर्टनुसार, बदल केल्यानंतर या दोन्ही प्लान्समध्ये १०० दिवसांची वैधता मिळू शकते.

वाचाः

काय मिळणार या नवीन प्लान्समध्ये
१०६ रुपये आणि १०७ रुपयांचे प्लान कंपनीचे प्रति सेकंद आणि प्रति मिनिटचे प्लान आहेत. सध्या यात २८ दिवसांची वैधता मिळते. १ डिसेंबर पासून ती थेट १०० दिवसांची करण्यात येणार आहे. मिनिट्स आणि डेटाचा वापर १०० दिवसांत केला जावू शकतो. तसेच ६० दिवसांसाठी बीएसएनएल ट्यून्सची सुविधा मिळणार आहे.

वाचाः

१ डिसेंबरपासून FRC 106 प्लान चे नाव बदलून प्रीमियम वर सेकंड प्लान आणि FRC 107 प्लान नाव बदलून प्रीमियम वर मिनिट प्लान केले जाईल. या प्लान्सला संपूर्ण भारतात लागू करण्यात येईल. याद्वारे बीएसएनएलच्या नवीन प्रीपेड ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जाईल.

वाचाः

प्रीपेड प्लान्सवर २५ टक्के डिस्काउंट
कंपनीने आपल्या इनअॅक्टिव ग्राहकांसाठी १८७ रुपये आणि १४७७ रुपयांच्या स्पेशल टॅरिफ वर २५ टक्के डिस्काउंटची घोषणा केली आहे. १८७ रुपयात सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग, रोज २ जीबी डेटा आणि १०० एसएमएस मिळणार आहे. हा २८ दिवसांच्या वैधतेसोबत येतो. याच प्रमाणे १४९९ रुपयांच्या प्लानमध्ये ३६५ दिवसांची वैधता, अनलिमिटेड कॉलिंग, २४ जीबी डेटा आणि रोज १०० एसएमएस मिळते.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here