वाचाः
रेडमी नोट ९ ला अॅक्वा ग्रीन, आर्कटिक व्हाइट आणि पेबल ग्रे कलरमध्ये उपलब्ध करण्यात आले होते. यानंतर अॅमेझॉन इंडिया प्राईम डे सेलमध्ये कंपनीने स्कारलेट रेड कलरमध्ये आणले होते. आता हा फोन आणखी एका पाचव्या शॅडो कलरमध्ये मिळणार आहे. रेडमी नोट ९ च्या शॅडो ब्लॅक कलरला ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेज व्हेरियंट, ४ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज आणि ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी व्हेरियंटमध्ये खरेदी करता येवू शकतो. फोनची किंमत ११ हजार ४९९ रुपये आहे. परंतु सूट नंतर या फोनला १० हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येवू शकते. नवीन शॅडो कलर mi.com वर लिस्ट करण्यात आला आहे.
वाचाः
चे खास वैशिष्ट्ये
या फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सोबत ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल, २ मेगापिक्सलचा मायक्रो आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सरचा क्वॉड रियर कॅमेरा सेटअप आहे. फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी १३ मेगापिक्सलचा एआय फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी ८५ प्रोसेसर आहे.
वाचाः
हँडसेट अँड्रॉयड १० बेस्ड MIUI 11 वर चालतो. फोनमध्ये ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी व १२८ जीबी इनबिल्ट स्टोरेज पर्याय दिला आहे. हँडसेटमध्ये ६.५३ इंचाचा फुल एचडी प्लस डॉट डिस्प्ले दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 5020mAh बॅटरी दिली आहे. फोनसोबत २२.५ वॉट फास्ट चार्जर मिळतो.
वाचाः
वाचाः
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times