नवी दिल्लीः शाओमीने आपला प्रसिद्ध प्रीमियम स्मार्टफोन चे उत्पादन आणि विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी लवकरच रेडमी के ३० प्रोचा सक्सेसरला लाँच करणार आहे. त्यामुळे कंपनीने या फोनची विक्री बंद करणार आहे. रेडमीचे चेयरमन Lu Weibing यांनी या फोनसंबंधी माहिती देत हा फोन बंद करण्यात येत असल्याच्या बातमीला दुजोरा दिला आहे.

वाचाः

गेल्या काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की, कंपनी आपल्या फ्लॅगशीप स्मार्टफोन Mi 10 Pro ला सुद्धा डिसकंटिन्यू करणार आहे. या सोबतच असेही सांगितले होते की, लाँच झालेला Mi 10 Pro Ultra सुद्धा आउट ऑफ स्टॉक होत आहे.

वाचाः

रेडमी K30 प्रो चे फीचर्स
फोनमध्ये 2400×1080 पिक्सल रेजॉलूशन दिला आहे. तसेच फोनमध्ये ६.६७ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. फोन इन डिस्प्ले फिंगरप्रिंट यासारखे फीचर्स सोबत येतो. ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 865 प्रोसेसर दिला आहे.

वाचाः

फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये चार रियर कॅमेरे दिले आहेत. यात ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर सोबत एक १३ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड सेन्सर, ५ मेगापिक्सलचा टेलिफोटो लेन्स आणि एक २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. सेल्फ आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये २० मेगापिक्सलचा पॉप अप कॅमेरा दिला आहे.

वाचाः

फोनला पॉवर देण्यासाठी यात 4,700mAh ची बॅटरी दिली आहे. ३० वॉट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट दिला होता. हा फोन अँड्रॉयड १० वर बेस्ड कंपनी MIUI ओएस वर काम करतो.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here