नवी दिल्लीः ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट Amazon आणि Flipkart वर सुरू आहे. हा सेल १३ नोव्हेंबर पर्यंत चालणार आहे. या दरम्यान वेगवेगळ्या बजेट मध्ये स्मार्टफोन्सवर डिस्काउंट मिळत आहे. तुम्हाला जर एक नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तसेच तो बजेट स्मार्टफोन हवा असेल तर या ठिकाणी १० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत जबरदस्त स्मार्टफोन खरेदी करायची संधी आहे.

वाचाः

Moto G9
मोटो जी ९ स्मार्टफोन फ्लिपकार्ट वरून ९९९९ रुपयांची सुरुवातीत खरेदी करू शकतो. स्मार्टफोनमध्ये ६.५ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले मिळतो. फोनमध्ये ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेज आणि क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ६६२ प्रोसेसर मिळतो. कॅमेऱ्यात ४८ मेगापिक्सलचा प्लस २ मेगापिक्सल प्लस २ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. फोनमध्ये 5000mAhची बॅटरी दिली आहे. जी २० वॉट टर्बोपॉवर फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळते.

वाचाः

Samsung M01s
अॅमेझॉनवर सॅमसंग गॅलेक्सी एम०१ एस स्मार्टफोनचे ३ जीबी प्लस ३२ जीबी मॉडलचा स्मार्टफोन ९ हजार ४९९ रुपयांत विकला जात आहे. फोनमध्ये ६.२ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले आणि ऑक्टाकोर मीडियाटेक MT6762 प्रोसेसर दिला आहे. फोनमध्ये १३ मेगापिक्सलचा प्लस २ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. यात 4000mAh ची बॅटरी दिली आहे.

वाचाः

Redmi 9 Prime
अॅमेझॉनवर रेडमी ९ प्राईम स्मार्टफोन ४जीबी रॅम प्लस ६४ जीबी मॉडलचा फोन ९ हजार ९९९ रुपये आणि ४ जीबी रॅम प्लस १२८ जीबी मॉडलला १० हजार ९९९ रुपयात खरेदी करू शकतो. स्मार्टफोनमध्ये ६.५३ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले मिळतो. फोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी ८० प्रोसेसर मिळतो. या फोनमध्ये १३ मेगापिक्सलचा प्लस ८ मेगापिक्सलचा प्लस ५ मेगापिक्सलचा प्लस २ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. फोनमध्ये 5020mAh बॅटरी दिली आहे. १८ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे.

वाचाः

Realme C15
फ्लिपकार्टवर रियलमी सी १५ स्मार्टफोनच्या ३ जीबी रॅम प्लस ३२ जीबी मॉडलला ८ हजार ९९९ रुपये आणि 4GB+64GB मॉडलला ९९९९ रुपयात खरेदी करता येवू शकते. स्मार्टफोनमध्ये ६.५२ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले आणि मीडियाटेक हीलियो जी ३५ प्रोसेसर मिळतो. या फोनमध्ये 13MP + 8MP + 2MP + 2MP रियर कॅमेरा आणि ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये 6000mAh बॅटरी दिली आहे.

वाचाः

Oppo A5s
अॅमेझॉनवर ओप्पोचा हा फोन 3GB+32GB मॉडल ला ८ हजार ९९० रुपयांत खरेदी करू शकता. स्मार्टफोनमध्ये ६.२ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले आणि मीडियाटेक हीलियो पी ३५ प्रोसेसर मिळतो. या फोनमध्ये 13MP + 2MP चा रियर कॅमेरा आणि ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये 4230mAh बॅटरी दिली आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here