नवी दिल्लीः बीएसएनएलने आपल्या युजर्ससाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. कंपनीने आपल्या वायफाय हॉटस्पॉट्स व्हाउचर्स मध्ये ३० जीबी पर्यंत डेटा देत आहे. या व्हाउचर्सची सुरुवातीची किंमत ९ रुपयांपासून सुरू होते. या व्हाउचर्सचे खास वैशिष्ट्ये म्हणजे याची वैधता ३० दिवसांची आहे. तसेच कंपनी पेटीएम अॅप द्वारे काही लोकेशनवर युजर्सला हाय स्पीड इंटरनेट सुद्धा ऑफर करीत आहे. सध्या जाणून घ्या आपल्या पब्लिक वायफाय हॉटस्पॉट व्हाउचमध्ये काय-काय ऑफर केले जात आहे.

वाचाः

३० दिवसांची वैधता
बीएसएनएल युजर्सला एकूण पाच पब्लिक वायफाय प्लान देत आहे. ९ रुपयांच्या या प्लानमध्ये एक दिवसांची वैधता मिळते. तसेच १ जीबी डेटा मिळतो. याप्रमाणे १९ रुपयांच्या व्हाउचर्समध्ये तीन दिवसांची वैधता मिळते. तसेच ३ जीबी डेटा मिळतो. ३९ रुपयांच्या व्हाउचर्समध्ये ७ दिवसांची वैधता आणि ७ जीबी डेटा, ५९ रुपयांच्या व्हाउचर्समध्ये १५ दिवसांची वैधता आणि १५ जीबी डेटा आणि ६९ रुपयांच्या व्हाउचर्समध्ये ३० दिवसांची वैधतेसोबत ३० जीबी डेटा दिला जात आहे.

वाचाः

मोबाइल अॅप किंवा वेबसाईटवरून कार अॅक्टिवेट व्हाउचर्स
बीएसएनएल युजर्स या प्लान्सला हॉटस्पॉट नेटवर्कवरून कनेक्ट करू शकतात. या शिवाय युजर्स कंपनीच्या मोबाइल अॅप किंवा वेबसाइटवर जावून या प्लानला रिचार्ज करू शकतात.

वाचाः

असे करा कनेक्ट
बीएसएनएल पब्लिक वाय फाय हॉटस्पॉट ने कनेक्ट करणे खूप सोपे आहे. बीएसएनएलला वायफाय हॉटस्पॉट झोनमध्ये आल्यानंतर आयओएस किंवा अँड्रॉयड वर एक नोटिफिकेशन मिळेल. या वायफाय नेटवर्कने कनेक्ट होवून बीएसएनएल मोबाइल नंबररला अॅक्टिव वाय फाय हॉटस्पॉट पॅकने व्हेरिफाइड करा.

वाचाः

याशिवाय कंपनी पेटीएम अॅप द्वारे वाय फाय हॉटस्पॉट ने कनेक्ट करण्याचा ऑप्शन देत आहे. यासाठी युजर्सला पेटीएम अॅपच्या आत दिल्या वाय फाय सेक्शनमध्ये जावून बीएसएनएल पब्लिक वाय फाय हॉटस्पॉट ने कनेक्ट होवू शकते. सध्या देशभरात ३१ हजार ८३६ लोकेशन्स वर जवळपास ५० हजार वायफाय हॉट्स्पॉट आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here