नवी दिल्लीः प्रसिद्ध आणि हिट स्मार्टफोन्सचे क्लोन लाँच होत आहेत, यात नवीन काही नाही. अॅपलच्या आयफोन याचे सर्वात मोठे उदाहरण आहे. आयफोनच्या लेटेस्ट मॉडल्सला अनेक छोट्या कंपन्यांनी कॉपी केले आहे. अॅपल आयफोन प्रमाणे आता चे क्लोन समोर आले आहे. या फोनच्या क्लोनचे नाव ivvi Mate 40 आहे. हा फोन नुकताच ऑनलाइन लिस्टिंगमध्ये स्पॉट करण्यात आला आहे.

वाचाः

किंमत जवळपास १० हजार रुपये
हुवावे गेल्या महिन्यात आपल्या फ्लॅगशीप मेट ४० सीरीजला लाँच केले होते. आता कंपनीने या सीरीजच्या फोनचे कॉपी व्हर्जन मार्केटमध्ये लाँच केले आहे. गंमत म्हणजे या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 865 SoC प्रोसेसर दिले आहे. तेही ओरिजनल व्हर्जनच्या तुलनेत खूप कमी किंमतीत. या कॉपी वहर्जनची किंमत ८९८ चिनी युआन म्हणजेच जवळपास १० हजार रुपये आहे.

वाचाः

५० मेगापिक्सलचा पेंटा कॅमेरा सेटअप
ऑनलाइन लिस्टिंगच्या माहितीनुसार, फोन ५० मेगापिक्सलचा पेंटा कॅमेरा सेटअप दिला आहे. तसेच या फोनमद्ये १० जीबी रॅम आणि २५५ जीबी इंटरनल मेमरी दिली आहे. ड्यूल मोड ५जी सोबत येणाऱ्या या फोनची डिझाईन जवळजवळ ओरिजनल हुवावे मेट ४० सारखी वाटत आहे.

वाचाः

स्लीम बेजलचा फोन
या फोनच्या सर्कूलर कॅमेरा मॉड्यूलमध्ये तुम्हाला ‘AICAMERA’ लिहिलेले दिसेल. तर ओरिजनल फोनमध्ये ‘LEICA’ लिहिले होते. दोन्ही डिव्हाईसच्या फ्लॅश प्लेसमेंटमध्ये फरक आहे. फोनच्या फ्रंटमध्ये तुम्हाला वॉटरड्रॉप स्टाइल नॉच मिळणार आहे. फोनचे बेजल स्लीम आहेत.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here