नवी दिल्लीः टेक ब्रँड अॅपल कडून ”इव्हेंटमध्ये नवीन प्रोडक्ट्स लाँच करण्यात आले आहे. कंपनीने गेल्या काही दिवसांपूर्वी आपला आयफोन १२ लाइनअपची घोषणा केली होती. आता दोन MacBooks आणले आहेत. याचे खास वैशिष्ट्ये म्हणजे अॅपलचे हे नवीन MacBooks कंपनीच्या नवीन एम१ प्रोसेसर सोबत आले आहेत. नवीन चिपसेट सोबत जास्त वेगाने SSDs आणि फॅनलेस डिजाइन सुद्धा मॅकबुक्समध्ये दिले आहेत.

वाचाः

MacBook Air
अॅपलेच पहिले प्रोडक्ट MacBook Air आहे. कंपनीच्या माहितीनुसार, गेल्या वेळीच्या Intel बेस्ड MacBooks Air च्या तुलनेत नवीन लॅपटॉप ३.५ पट अधिक फास्ट आहे. तसेच पाच पट चांगले ग्राफिक्स परफॉरमन्स देते. अॅपलच्या माहितीनुसार, Windows डिवाइसेज च्या तुलनेत M1 बेस्ड MacBooks Air तीन पट अधिक फास्ट परफॉर्मन्स देते. बॅटरी बॅकअप मध्ये यात युजर्संना १५ तासांचा वायरलेस ब्राउजिंग करता येईल.

वाचाः

M1 च्या इमेज सिग्नल प्रोसेसर च्या मदतीने MacBook Air जबरदस्त नॉइज रिडक्शन, डायनामिक रेंज आणि इंप्रूव्ड ऑटो वाइट बॅलन्स सुद्धा ऑफर करते. युजर फेसटाइम कॉल्स दरम्यान जास्त नॅचरल दिसते. १३ इंच रेटिना डिस्प्ले शिवया नवीन Air MacOS Big Sur सोबत येते. तसेच यात TouchID अनलॉक सिस्टम दिले आहे. बेस मॉडल साठी याची किंमत ९९९ डॉलर म्हणजेच जवळपास ७४ हजार रुपये ठेवण्यात आली आहे.

वाचाः

जास्त पॉवरफुल MacBook Pro मध्ये ११ पट जास्त वेगाची मशीन लर्निंग दिली आहे. जी कंपनीच्या माहितीनुसार जगातील सर्वात वेगवान कॉम्पॅक्ट नोटबुक बनवते. एम१ चिपसेट च्या मदतीने नवीन MacBook कडून १७ तासांचा वायरलेस वेब ब्राउजिंग आणि २० तासांचा व्हिडिओ प्ले बॅक लाइफ ऑफर करते. अॅपलच्या म्हणण्यानुसार, कोणत्याही मॅक प्रोडक्टशी मिळणारी ही सर्वात जास्त बॅटरी लाइफ आहे. चार पट जास्त कोड कंपाइलिंग, स्टूडिओ क्वॉलिटी मायक्रोफोन आणि लो लाइट मध्ये इंप्रूव्ड कंट्रास्टचे वेबकॅम यासारखे फीचर्स यात दिले आहेत. नवीन MacBook Pro चे बेस मॉडल मार्केटमध्ये १२९९ डॉलर म्हणजेच ९६ हजार ३०० रुपये याची किंमत ठेवली आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here