नवी दिल्लीः जगात सर्वात जास्त स्मार्टफोन्समध्ये अँड्रॉयड सिस्टम ऑपरेटिंग सिस्टम मिळतो. अँड्रॉयड युजर्सची आकडेवारी सुद्धा खूप वेगाने वाढली आहे. अनेकदा युजर्स नवीन डिव्हाईस खरेदी करतात परंतु, ते अपडेट करणे विसरून जातात. अजूनही खूप जण जुन्या स्मार्टफोनचा वापर करीत आहेत. परंतु, त्याला अपडेट केले नाही. जर तुम्ही सुद्धा असेच डिव्हाइस वापरत असाल ज्यात जुने अँड्रॉयड सिस्टम असेल तर तुम्हाला फोन ओएस अपग्रेड करणे आवश्यक आहे.

वाचाः

मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले की, अँड्रॉयड सॉफ्टवेयर व्हर्जन ७.१ किंवा यापेक्षा जुन्या अँड्रॉयड व्हर्जनवर चालत असलेल्या स्मार्टफोन्सला लेटेस्ट सॉफ्टवेयर व्हर्जनवर अपग्रेड करणे आवश्यक आहे. इंटरनेट अॅक्सेस करणे गरजेचे आहे. सर्टिफिकेट अथॉरिटी Let’s Encrypt आणि सर्टिफिकेट अथॉरिटी Iden Trust या दरम्यान पार्टनरशीप एक्सपायर झाल्याने असे करणे गरजेचे आहे. जगभरात एकूण अँड्रॉयड डिव्हाइसपैकी ६६.२ टक्के अँड्रॉयड ७.१ किंवा यापेक्षा जुन्या व्हर्जनवर काम करतो.

वाचाः

एका वर्षापेक्षा कमी वेळ
समोर आलेल्या डिव्हाइसेजमध्ये ३३.८ टक्के आधीच सर्टिफिकेट एरर्स दिसते. त्यामुळे Let’s Encrypt सर्टिफिकेट कोणत्याही वेबसाइटला अॅक्सेस करताना होत आहे. Let’s Encrypt काही सर्वात मोठी सर्टिफिकेट अथॉरिटीजमध्ये सहभागी आहे. तसेच ३० टक्के वेब डोमेन्सला कंपनीकडून सर्टिफिकेशन्स दिले आहे. सर्टिफिकेट अथॉरिटी संबंधी पार्टनरशीप १ सप्टेंबर २०२१ रोजी एक्सपायर होणार आहे. त्यामुळे एक वर्षापेक्षा कमी वेळ राहिला आहे.

वाचाः

नवा फोन खरेदी करावा लागेल
रिपोर्ट्समधून समोर आले आहे की, Let’s Encrypt आणि IdenTrust कडून पार्टनरशीप रिन्यू करण्याची कोणतीही योजना नाही. त्यामुळे युजर्संना लेटेस्ट सॉफ्टवेयर व्हर्जन अपग्रेड करावे लागेल. पार्टनरशीप एक्सपायर झाल्यानंतर जुन्या अँड्रॉयड व्हर्जनवर स्मार्टफोनचा वापर करीत असलेल्या युजर्संना वेबसाइट्स अॅक्सेस फोनच्या वेब ब्राउजर करू शकणार नाहीत.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here