वाचाः
एअरटेलच्या या नवीन अॅपच्या मदतीने युजर्स कोणत्याही फोनने आपले एअरटेल अकाउंट मॅनेज करू शकतात. अॅपच्या मदतीने युजर्स आपल्या एअरटेल प्रीपेड नंबरला कोणत्याही २ जी कनेक्शनच्या मदतीने रिचार्ज करू शकतात. याचाच अर्थ कमीत रॅम आणि स्टोरेजच्या बजेट डिव्हाइसेजवर आता युजर्सला या अॅपचा फायदा मिळणार आहे. पेमेंट्स करम्यासाठी या अॅपला इंटरफेस युजर फ्रेंडली बनवण्यात आले आहे. कंपनीने याला स्टँडर्ड एअरटेल थँक्स अॅपचे स्मॉल आणि लाइट व्हर्जन बनवले आहे.
वाचाः
अॅपवर अनेक सर्विसेज
नवीन अॅप लाइट कमी रॅम आणि बॅटरीचा वापर करतो. या प्रमाणे फोनची बॅटरी वेगाने संपत नाही. या अॅपवर आपला एअरटेल नंबर रिचार्ज करण्याशिवाय युजर्सला रेकमेंडेड पॅक्स, रिचार्ज डिस्काउंट्स आणि कॅशबॅकचे पर्याय मिळणार आहेत. तसेच लाइट अॅप वर युजर्संना अकाउंट डिटेल्स पासून पॅक वैधता आणि डेली डेटा बॅलन्स आणि टॉकटाइम बॅलन्स चेक करता येवू शकते. नवीन एअरटेल लाइट अॅप वर लेटेस्ट न्यूज आणि अपडेट्स युजर्संना मिळणार आहेत.
वाचाः
फ्री मध्ये ऐकायला मिळतील गाणे
भारतीय टेलिकॉम सेक्टर वेगाने बदलत आहेत. रिलायन्स जिओ नंतर एअरटेल प्रीपेड मार्केटमध्ये सर्वात मोठा प्लेयर आहे. एअरटेल काही खास बेनिफिट्स युजर्संना अॅपच्या मदतीने रिचार्ज केल्यास देत आहे. आता नवीन लाइट अॅपच्या मदतीने सर्वात जास्त युजर्संना याचा फायदा मिळणार आहे. रिलायन्स जिओ सुद्धा माय जिओ अॅपवर अनेक सर्विसेज आपल्या युजर्संना देत आहे. एअरटेलच्या लाइट अॅपवर युजर्स लेटेस्ट ट्रेंडिंग गाणे सुद्धा Wynk Radio च्या मदतीने ऐकू शकतील.
वाचाः
वाचाः
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times