वाचाः
कँडी बार डिझाइनच्या या दोन्ही फीचर फोनमध्ये गुगल असिस्टेंट आणि व्हॉट्सअॅप सपोर्ट मिळतो. दोन्ही फोनचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात वाय फाय हॉटस्पॉट वापर केला जावू शकतो. तसेच या शिवाय या दोन्ही फोनमध्ये गुगल मॅप्स, फेसबुक आणि यूट्यूबचे अॅक्सेस करू शकता येते.
वाचाः
नोकिया 6300 4G चे फीचर
फोनमध्ये २.४ इंचाचा डिस्प्ले दिला आहे. ५१२ एमबी रॅम आणि ४ जीबी इनबिल्ट स्टोरेज सोबत येणाऱ्या या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन २१० प्रोसेसर दिला आहे. फोनची मेमरी मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने ३२ जीबी पर्यंत वाढवता येवू शकते.
वाचाः
फोटोग्राफीसाठी यात फ्लॅशलाइटसोबत व्हीजीए कॅमेरा दिला आहे. या फ्लॅशलाइटचा वापर टॉर्च म्हणून केला जातो. फोनमध्ये 1500mAh ची बॅटरी दिली आहे. कंपनीचा दावा आहे की, ही बॅटरी २७ दिवसांचा स्टँडबाय टाईम देते. फोनमध्ये जीपीएस, ब्लूटूथ, ड्यूल नॅनो सिम सपॉर्ट, एफएम रेडियो आणि एक ऑडियो जॅक दिला आहे.
वाचाः
नोकिया 8000 4G चे फीचर
फीचरमध्ये हे नोकिया 6300 4G सारखेच आहेत. फोनमध्ये २.८ इंचाचा डिस्प्ले दिला आहे. फोटोग्राफीसाठी यात VGA ऐवजी २ मेगापिक्सलचा सेंसर दिला आहे. डिझाइनमध्ये हा 6300 4G पेक्षा थोडा वेगळा आहे. याच्या फ्रंट पॅनल कर्व्ड एज आहे. बॅक पॅनेलवर दिलेला ग्लास फिनिश मटेरियल फोनला प्रीमियम लूक देतो.
वाचाः
फोनमध्ये ४ जीबी इंटनरल मेमरी आणि ५१२ एमबी रॅम सोबत स्नॅपड्रॅगन २१० प्रोसेसर दिला आहे. या फोनमध्ये 1500mAh बॅटरी दिली आहे. ही बॅटरी ८.२ तासांपर्यंत टॉक टाइम देवू शकते. कनेक्टिविटीसाठी या फोनमध्ये 3.5mm हेडफोन जॅक सोबत वाय फाय, ब्लूटूथ, ए जीपीएस आणि एफएम रेडिओ यासारखे फीचर्स मिळू शकतात.
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times