नवी दिल्लीः विवो लवकरच आपली एक्स सीरीजचे दोन फोन आणि X60 Pro ला लाँच करणार आहे. दोन्ही डिव्हाइसेजला लाँच होण्यास अजून वेळ आहे. परंतु, या दरम्यान, दोन्ही स्मार्टफोनचे लाइव इमेज लीक झाले आहेत. लीक फोटोला चीनच्या मायक्रो ब्लॉगिंग वेबसाइट विबोवर शेयर करण्यात आले आहे. तर आणखी एक टिप्स्टरने या दोन्ही अपकमिंग स्मार्टफोन्सची किंमत सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

वाचाः

पंचहोल सेल्फी कॅमेरा आणि कर्व्ड स्क्रीन
डिजिटल चॅट स्टेशनने आपल्या विबो पोस्टमध्ये लिहिले आहे की, विवो एक्स ६० आणि विवो एक्स ६० प्रो मध्ये पंच होल डिझाईनचा सेल्फी कॅमेरा मिळणार आहे. तर एक्स ६० प्रोमध्ये कंपनी कर्व्ड स्क्रीन ऑफर करू शकते. आणखी एका फोटोत पाहिले जावू शकते की, प्रो व्हेरियंटमध्ये कंपनी ओएस म्हणून अँड्रॉयड १० वर बेस्ड नवीन OriginOS ऑफर करू शकते. लेटेस्ट OriginOS ला कंपनी १८ नोव्हेंबर रोजी चीनमध्ये लाँच करणार आहे.

वाचाः

४० हजारांच्या जवळपास असू शकते किंमत
आर्सेनल नावाच्या एका टिप्स्टरच्या माहितीनुसार, विवो एक्स ६० आणि एक्स ६० प्रोमध्ये प्रोसेसर म्हणून सॅमसंगच्या Exynos 1080 SoC चिपसेट चा वापर केला जावू शकतो. विवोच्या या दोन्ही स्मार्टफोन सर्वात आधी चीनमध्ये लाँच करण्यात येणार आहेत. लीक रिपोर्टनुसार, चीनमध्ये विवो एक्स ६० ची सुरुवातीची किंमंत ३९ हजार ४०० रुपये असू शकते. तर विवो एक्स ६० प्रोची सुरुवातीची किंमत यापेक्षा थोडी जास्त असू शकते.

वाचाः

प्रो एडिशनमध्ये स्नॅपड्र्रॅगन प्रोसेसर मिळण्याची शक्यता
फीचरमध्ये टिप्स्टरच्या माहितीनुसार, विवो एक्स ६० प्रोमध्ये Exynos 1080 SoC च्या ऐवजी स्नॅपड्रॅगन 875 SoC दिला जावू शकतो. दोन्ही फोन अँड्रॉयड ११ वर बेस्ड ओरिजिन ओएस सोबत येवू शकतात. कंपनी विवो एक्स ६० सीरीजमध्ये तिसरा फोन सुद्धा येवू शकतो. याचे नाव विवो X60s 5G असू शकते.

वाचाः

३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळू शकतो
या वर्षी जुलैमध्ये डिव्हाइसला ब्लूटूथ एसआयजी लिस्टिंगमध्ये पाहिले गेले आहे. सांगितले जात आहे की, फोन ८ जीबी रॅम आणि स्नॅपड्रॅगन 765G SoC सोबत ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट सोबत येवू शकते. या सीरीजमध्ये किती फोन येवू शकतात. यासंबंधी विवोकडून कोणतीही माहिती शेयर करण्यात आली नाही.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here