रामेश्वर जगदाळे

भाऊबीजेच्या दिवशी बहिणीनं भावाला ओवाळलं, की भाऊ तिला ओवाळणी घालतो ही वर्षानुवर्षाची परंपरा. यंदा करोनामुळे प्रत्यक्ष भेटीगाठी होणंही कठीण झालंय. काही घरांमध्ये ऑनलाइन, व्हिडीओ कॉलवर भाऊबीज साजरी होणार आहे. सणाचा आनंद वाढवण्यासाठी एकमेकांना अत्याधुनिक गॅजेट देण्याबरोबरच डिजिटल वॉलेटही सोबत असतील. म्हणजे ओवाळणीची रक्कम भावाकडून थेट डिजिटल वॉलेटमध्ये जमा करण्यात येईल. हा ट्रेंड आता दिसून येऊ लागलाय.

वाचाः

काही कुटुंबांमधले भाऊ किंवा बहीण परदेशी असते. त्यामुळे दिवाळीच्या सणाला त्यांची भेट होतेच असं नाही. तसंच यंदा करोनाच्या सावटामुळेही सर्व भावा-बहिणीची भेट होऊ शकणार नाही. प्रत्येक गोष्टीवर ऑनलाइन उतारा असताना भाऊबीजेलाही अनेकांनी ऑनलाइनचा आधार घेतला आहे. इंटरनेटवर उपलब्ध असणाऱ्या वेबसाइट आणि इतर गोष्टींचा वापर करून यंदाची भाऊबीज साजरी करण्याचा अनेक कुटुंबांचा आणि भावा-बहिणींचा प्लॅन असणार आहे. भावानं दिलेल्या प्रेमाच्या ओवाळणीचं मोल हे कुठल्याही बहिणीसाठी मोठं असतं. सध्या बाजारात आणि इंटरनेटवर ओवाळणीसाठी नवनवीन गोष्टी उपलब्ध झाल्या आहेत. त्यात भर पडली आहे अत्याधुनिक गॅजेटची.

वाचाः

आपल्या भावाला किंवा बहिणीला ट्रेंडिंग आणि टेक्नोसॅव्ही गोष्टी भेट देऊन खुश करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. पारंपरिक पद्धतीनं देण्यात येणाऱ्या ओवाळणीची जागा यंदा अनेक डिजिटल वॉलेटनं घेतली आहे. ई-वॉलेट कंपन्यांनी त्यात अनेक खास ऑफर तसेच मोठी कॅशबॅक देऊ केली आहेत. जोडीला अनेक नवनवीन पोर्टल तसंच वेबसाईट सध्या इंटरनेटवर उपलब्ध आहेत. ज्या ठरावीक वेळी तुम्हाला तुमच्या बहिणीच्या किंवा भावाच्या आवडीच्या गोष्टी अगदी ओवाळणीच्या वेळेला सुरक्षित पद्धतीनं घरपोच करतील. ज्यामुळे तुमचे पैसे आणि वेळ दोन्ही वाचतील आणि सणाचा मनसोक्त आनंद घेता येईल, असं सांगितलं जातंय. त्यात निरनिराळ्या ऑफर्ससह डिजिटली भाऊबीज साजरी होताना दिसणार आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here