नवी दिल्लीः सॅमसंग आपल्या एम सीरीज अंतर्गत कमीत कमी ४ स्मार्टफोन्सवर काम करीत आहे. Galaxy M02 एन्ट्री-लेवल स्मार्टफोनला या महिन्याच्या अखेरला लाँच करू शकते. तर Galaxy M12 ला नुकतेच CAD रेंडर्स मध्ये पाहिले गेले होते. तसेच दक्षिण कोरियाची कंपनी Galaxy M42 आणि Galaxy M62 स्मार्टफोन्स वर काम करीत आहे. आता एम ४२ ला ३ सी सर्टिफिकेशन प्लॅटफॉर्मवर पाहिले गेले आहे. लिस्टिंगवरून या डिव्हाइसच्या बॅटरीची माहिती उघड झाली आहे.

वाचाः

३ सी लिस्टिंगवरून ही माहिती उघड झाली आहे की EB-BM425ABY बॅटरीची क्षमता 5830mAh असणार आहे. यावरून हे संकेत मिळत आहेत की, आगामी गॅलेक्सी एम ४२ स्मार्टफोनमध्ये टिपिकल बॅटरी क्षमता 6000mAh असणार आहे. बॅटरीला DEKRA आणि BIS सर्टिफिकेशन मिळाले आहे. बीआयएस लिस्टिंगवरून हे संकेत मिळत आहेत की, Galaxy M42 भारतात लाँच करू शकतात.

वाचाः

सप्टेंबर महिन्यात याचा खुलासा झाला होता की, गॅलेक्सी एम ४२ मध्ये ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा दिला जाणार आहे. हँडसेटमध्ये १२८ जीबी इनबिल्ट स्टोरेज दिला जाणार आहे. दक्षिण कोरियाची कंपनीकडून सप्टेंबर महिन्यात सॉफ्टवेयर डेव्हलप करण्याची माहिती समोर आली होती. या फोनला या वर्षीच्या अखेरपर्यंत लाँच केले जावू शकते.

वाचाः

गॅलेक्सी एम १२ च्या CAD रेंडर्स चा फोटो टिप्स्टर OnLeaks ने शेयर केला आहे. या फोटोवरून खुलासा करण्यात आला आहे की, गॅलेक्सी एम ४२ चे रियर डिझाइन गॅलेक्सी एम ४२ ५जी प्रमाणे असणार आहे. फोनमध्ये ६.५ इंचाचा डिस्प्ले, क्वॉड रियर कॅमेरा आणि फिंगरप्रिंट स्कॅनर यासारखे फीचर्स असू शकतात. गॅलेक्सी एम ६२ मध्ये २५६ जीबी इनबिल्ट स्टोरेज सोबत लाँच केले जावू शकते.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here