सध्या व्हॉट्सअॅपवर १६ पानांचे एक बुकलेट व्हायरल होत आहे. या बुकलेटचे कव्हर भगव्या रंगाचे असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. यांचा फोटो लावण्यात आलेला आहे. त्याशिवाय या बुकलेटवर ‘नया भारतीय संविधान-मोहन भागवत’ असे लिहिण्यात आले आहे.

टाइम्स फॅक्ट चेकच्या एका वाचकाने हे बुकलेट आम्हाला व्हॉट्स अॅप क्रमांक ८५२७००१४३३ या क्रमांकावर पाठवला आणि सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

या बुकलेटनुसार नवीन संविधान २१ मार्च २०२०पासून लागू (हिंदू दिनदर्शिकेनुसार नवीन वर्ष) होणार आहे.

पुर्ण बुकलेटचा सारांश पुढील चार मुद्यांमध्ये समजून घेता येईल
– भारताच्या नव्या संविधानानुसार भारताला आता फक्त हिंदुस्थान असे संबोधण्यात येईल.

– सरकारी नोकऱ्यांमध्ये पदांचे वाटप, नियुक्ती, संसद आणि विधीमंडळातील सदस्यांची निवडणूक ही चार वर्णांच्या आधारे करण्यात येईल.

– देवाने स्त्रियांना जन्म फक्त मुलं जन्माला घालण्यासाठी पृथ्वीवर पाठवले आहे. त्यामुळे त्यांचे अधिकारही हिंदू धर्मानुसार देण्यात येतील. त्यांना मतदानाचा अधिकार नसणार.

-हिंदुस्थानचे राष्ट्रपती, प्रधानमंत्री, मंत्री, राज्यांचे मुख्यमंत्री व मंत्री, संसद व विधीमंडळाचे सदस्य हे ब्राह्मण समाजाचे असतील.

या बुकलेटच्या शेवटी एक सूचनाही देण्यात आली आहे. हे संविधानाचे संक्षिप्त रुप असून जनतेने आपले विचार आणि सूचना १५ मार्च २०२० पर्यंत पंतप्रधान कार्यालय, नवी दिल्ली येथे पाठवाव्यात. चांगल्या सुचनेसाठी १० हजार रुपयांचे पारितोषिक असल्याचेही यात नमूद करण्यात आले आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आली आहे. हे संघाला बदनाम करण्याचे षडयंत्र असून भारतीय संविधानाबाबत आम्हाला पूर्णपणे आस्था असल्याचे संघाचे नेते श्रीधर गाडगे यांनी म्हटले. सरसंघचालकांद्वारे असे कोणतेही पुस्तक लिहीण्यात आले नसून या मेसेजबाबत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली असल्याचे त्यांनी म्हटले.

याआधी आरएसएसचे अखिल भारतीय सहप्रचार प्रमुख नरेंद्र कुमार यांनी आपल्या व्हेरिफाइड ट्विटर हॅण्डवरून ही पुस्तिका म्हणजे संघाच्या बदनामीचे प्रयत्न असल्याचे म्हटले. त्यांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवरून व्हिडिओ ट्विट करत भूमिका स्पष्ट केली आहे.

या व्हिडिओत मोहन भागवत यांचे एक वक्तव्यदेखील जोडण्यात आले आहे. देशात संविधानाने निश्चित केलेल्या जबाबदाऱ्यांकडे सत्ता व त्याची शक्ती आहे. अन्य दुसरं कोणतेही पर्यायी सत्ताकेंद्र उभं राहत असल्यास आमचा त्यास विरोध असल्याचे भागवत असल्याचे दिसते.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here