नवी दिल्लीः Samsung आपल्या गॅलेक्सी M-सीरीज मध्ये 7000mAh बॅटरीचा आणखी एका स्मार्टफोनवर काम करीत आहे. ला २०२१ च्या सुरुवातीला लाँच केले जावू शकते. अधिकृत रिलीज होण्याआधी टिप्स्टर OnLeaks आणि Voice ने फोनचा फोटो पब्लिश केला आहे.

वाचाः

Samsung Galaxy M12 दिसायला गॅलेक्सी ए ४२ ५ जी सारखा आहे. स्मार्टफोनचा रियर पॅनेल प्लास्टिक युनिबॉडीचा बनवलेला आहे. फ्रंट फ्लॅट आहे तसेच रियरवर स्क्वायर कॅमेरा मॉड्यूल आहे. कॅमेऱ्यात मॉड्यूल मध्ये चार सेन्सर उपलब्ध आहेत. कॅमेरा मॉड्यूल फ्लॅश खाली दिलेला आहे.

वाचाः

या फोटोवरून खुलासा झाला आहे की, जुन्या गुगलच्या पिक्सल फोन्स प्रमाणे एम १२ मध्ये रियर वर टू टोन टेक्स्चर फिनिश आहे. गॅलेक्सी ए ४२ ५ जी पेक्षा वेगळा येणाऱ्या गॅलेक्सी एम १२ च्या पॉवर बटनमध्ये फिंगरप्रिंट सेंन्सर इंटिग्रेट आहे. या बदलावरून माहिती होत आहे की, एम १२ ला गॅलेक्सी ए ४२ पेक्षा कमी किंमतीत लाँच केले जावू शकते. जवळून पाहिल्यास एम १२ ला गॅलेक्सी ए ४२ पेक्षा कमी किंमतीत लाँच केले जाईल. जवळून पाहिल्यास फोनमध्ये फ्रंटवर इनफिनिटी व्ही नॉच दिली आहे. फोटोच्या माहितीनुसार, फोनमध्ये ६.५ इंचाचा डिस्प्ले असणार आहे.

वाचाः

Onleaks-Voice पोस्ट वरून हेही माहिती होत आहे की, सॅमसंग मार्केटच्या हिशोबानुसार, फोनला वेगळ्या नावाने लाँच करू शकते. सॅमसंगच्या 7000mAh बॅटरीचा फोन गॅलेक्सी एफ १२ या नावाने येत असल्याची माहिती आहे. याआधी आलेल्या बातम्यानुसार, स्मार्टफोनमध्ये एक्सीनॉस 9611 ऑक्टा-कोर प्रोसेसर आणि ४ जीबी रॅम दिला जावू शकतो. हँडसेटमध्ये ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सोबत ८ मेगापिक्सलचा आणि ५ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा दिला जावू शकतो. सेल्फीसाठी या फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा सेन्सर दिला जावू शकतो. फोनला १३ हजार रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात येणार असल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here