नवी दिल्लीः मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅपकडून नुकतेच अनेक फीचर्स लाँच करण्यात आले आहे. तसेच त्यांना टेस्ट केले जात आहे. ओवरऑल युजर एक्सपीरियन्स जबरदस्त करण्यासाठी फेसबुकची मालकी असलेल्या व्हॉट्सअॅपवर Archived Chats चे नवीन वर्जन ‘Read Later’ फीचर या नावाने येत आहे. मध्ये येणारे Read Later फीचर काय आहे तसेच ते कसे काम करणार यासंबंधीची डिटेल्स लवकरच समोर येतील. युजर्स निवडक कॉन्टॅक्टसाठी Read Later ऑप्शन सिलेक्ट करू शकतील.

वाचाः

Read Later फीचरच्या मदतीने युजर्स सिलेक्टेड चॅट्सला हवे त्या वेळी म्यूट करू शकतील. रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, हे फीचर Vacation Mode प्रमाणे काम करणार आहे. यावर कंपनी खूप दिवसांपासून काम करीत आहे. सध्या Archived Chat ऑप्शन आणि नवीन फीचरमध्ये मोठे अंतर हे आहे की, Read Later मध्ये कॉन्टॅक्ट सिलेक्ट केल्यानंतर नवीन मेसेज आल्यानंतर नोटिफिकेशन मिळत नाही. तर चॅट आर्काइव केल्यावर नवीन मेसेज येताच नोटिफिकेशन मिळते.

वाचाः

कसे काम करणार Read Later?
जर तुम्हाला एखाद्या कॉन्टॅक्टच्या मेसेजेसला वाचायची इच्छा नसेल नसेच किंवा चॅटिंग करायची नसेल तर तुम्ही Read Later ऑप्शनमध्ये त्या कॉन्टॅक्टला अॅड करू शकता. यानंतर कोणत्याही प्रकारचे नोटिफिकेशन त्या कॉन्टॅक्टमधून तुम्हाला येणार नाहीत. नवीन युजर्स एक्सपीरियन्स अॅपवर जबरदस्त बनवला आहे. फालतू मेसेज मुळे तुम्हाला त्रास सहन करावा लागणार नाही. Read Later ऑप्शनला युजर्स आपल्या मर्जीने कधीही इनेबल किंवा डिसेबल करू शकतील. लवकरच यासंबंधीची अधिकृत डिटेल्स शेयर केले जातील.

वाचाः

कधी मिळणार नवीन फीचर
व्हॉट्सअॅप कोणतेही फीचर सर्व युजर्ससाठी रोलआउट करण्याआधी सर्वात आधी बीटी व्हर्जन च्या युजर्संसोबत टेस्ट करतो. रिड लेटर ऑप्शन सुद्धा व्हॉट्सअॅप बीटा फॉर आयओएस व्हर्जन 2.20.130.1 वर पाहिले गेले आहे. या फीचरला आता टेस्ट केले जात आहे. लवकरच हे अँड्रॉयड युजर्ससाठी रोलआउट केले जावू शकते. नवीन रिड लेटर फीचरला कंपनी पुढील वर्षीच्या सुरुवातीला सर्व युजर्सपर्यंत आणू शकते.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here